ताज्या बातम्या
बालरोगतज्ञ डॉ.धीरज पाटील यांनी साळवे येथील शाळेत केली मोफत आरोग्य तपासणी
धरणगाव – तालुक्यातील ग्रामसुधारणा मंडळ साळवे संचलित, प.पू.साने गुरुजी सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय, साळवे येथील बालवाडी ते पाचवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी धरणगाव येथील आराधना हाँस्पिटलचे संचालक डॉ धीरज पाटील यांनी मोफत करून आवश्यक ती औषधे मोफत उपलब्ध करून दिली व पालकांना सल्ला व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे यांनी आरोग्य चांगले रहावे यासाठी योग्य खानपान व व्यायामाची आवश्यकता याचे महत्व पटवून दिले. खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे यांनी आभार मानले. यावेळी एस पी तायडे, ए वाय शिंगाणे, प्राथमिक च्या शिक्षिका श्रीमती वर्षा नेहेते, सारीका नेहेते, कांचन अत्तरदे व अनिता अहिरे यांनी सहकार्य केले.