बीड : राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघ जाहीर, मुंबईतून कटकला होणार रवाना
25 ते 27 मार्च दरम्यान होणार राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा !
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया ला भारत सरकारची मान्यता !!
बीड – राष्ट्रीय सब ज्युनियर क्योरुगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून, संघ बुधवारी रात्री मुंबई येथून कटक ( ओडिसा) साठी रवाना होणार आहे, तसेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया ला भारत सरकारची मान्यता मिळाली असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने कटकच्या (ओडिशा) जे. एन. इनडोअर स्टेडियममध्ये 25 ते 27 मार्च दरम्यान राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या संघाची घोषणा ‘ताम’चे महासचिव मिलिंद पठारे यांनी केली. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत टी. कांबळे, तर संघ व्यावस्थापक म्हणून जळगाव जिल्हा असोसिएशनचे सचिव तथा राज्य संघटना सदस्य अजित घारगे यांची निवड करण्यात आली. मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून अहमदनगरचे दिनेशसिंग राजपूत यांची तर पुमसे संघाचे प्रशिक्षक म्हणून रॉबिन वॉल्टर मेनेझेस यांनी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा डेरवण (रत्नागिरी) येथे पार पडली. या स्पर्धेतील विजेत्यांची राज्य संघात निवड करण्यात आली. राज्य स्पर्धा व्यंकटेश कररा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य आयोजित करण्यात आली. ‘ताम’चे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा यांच्यासह शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, नीरज बोरसे, अजित घारगे, बालाजी जोगदंड पाटील, सतीश खेमसकर , विजय कांबळे आदींनी महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्राचा संघ मुले : वियान दिघे (पुणे), यश भारत पस्ते (मुंबई उपनगर), आर्यन शांताराम वानखेडे (जळगाव), सार्थक राजू निमसे (नगर), सोहम सुदेश खामकर (रत्नागिरी), मोहंमद झैद वसीम हमदुले (रत्नागिरी), तनिष्क सुनील सागवेकर (मुंबई), कृष्णा जाधव (पुणे), श्रीधर मोहिते (पुणे), अर्णव बावडकर (पुणे), वेद वि. मोरे (रायगड), रोनित प्रणाम जाधव (ठाणे), सौम्या एस. दास (मुंबई उपनगर), विघ्नेश गायकवाड (पुणे). मुली : सुरभी राजेंद्र पाटील (रत्नागिरी), अनन्या अच्युतराव रणसिंग (नगर), वैष्णवी नीलेश बेरड (नगर), प्रियांका प्रकाश मिसाळ (नगर), श्रावणी अच्युतराव रणसिंग (नगर), संचिता एस. घाणेकर (मुंबई), साजिया मोहम्मद हुसेन शेख (नगर), सार्थ संजय ठाकूर (मुंबई), स्वरा संतोष नितोरे (पालघर), आर्या मनीष काळे (अमरावती), तमसीन वाजिद शेख (सोलापूर), शेजल श्रीमल (पुणे), उज्ज्वला मरगळे (पुणे), पुमसे संघ : अर्णव दिलीप जगताप (ठाणे), तनिष्का वेल्हाळ (मुंबई), ग्रेसन अंकुर गावित (ठाणे), राधिका ऋषिकेश भोसले (ठाणे), शौर्य धनंजय जाधव (ठाणे), अर्णव दिलीप जगताप (ठाणे), आर्या चव्हाण (मुंबई), प्रतिती देसाई (मुंबई). चौकट—— ‘टीएफआय’ला क्रीडा मंत्रालयाची मान्यता तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) या अधिकृत राष्ट्रीय संघटनेला 17 मार्च रोजी भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे, तसेच तायक्वांदो खेळातील अधिकृत राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणूनही मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त समितीने निवृत्त न्यायाधीश जी. एस. सस्तानी यांच्या निरीक्षणाखाली ‘टीएफआय’ची निवडणूक इंडियन ऑलिम्पिकच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये ‘टीएफआय’चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश इशारी, महासचिवपदी आर. डी. मंगेशकर, कोषाध्यक्षपदी जस्वीरसिंह गिल यांची निवड करण्यात आली. याच राष्ट्रीय महासंघाने महाराष्ट्रात तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ‘ताम’च्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे, महासचिवपदी मिलिंद पठारे व कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा यांच्या ‘ताम’ मुंबई या राज्य संघटनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व अधिकृत जिल्हा संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.