बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांनी बिश्नोई समाजाची माफी मागावी : विकास पवार (पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता व राजकीय विश्लेषक)
सरकारने तसेच राजकीय पक्षांनी, प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने यासाठी मध्यस्थी करून महाराष्ट्र मध्ये होणारे गॅंगवॉर थांबवावा
◀️ छत्रपती शिवरायांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र मध्ये लॉरेन्स बिश्नोई सारखा व्यक्ती महाराष्ट्राचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्र वेळेत जागा दाखवून दिले जाईल.
परंतु लॉरेन्स बिश्नोई याची मागणी आहे की बिश्नोई समाजाची अभिनेता सलमान खान यांनी माफी मागावी कारण सध्या स्थितीत घडलेल्या परिस्थितीनुसार अभिनेता सलमान खान यांनी बिश्नोई समाजाची माफी मागणे गरजेचे आहे . कारण आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आजूबाजूला राहणाऱ्या स्थायिक नागरिकांना सुद्धा याचा परिणाम भोगावे लागू शकतो तसेच अनेक राजकीय व्यक्तीबरोबर अभिनेता सलमान खान यांचे जवळीक संबंध आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा राजकीय व्यक्तींना तसेच अनेक संबंधित व्यक्तींना जीवाला धोका आहे असे यावरून वाटते. त्यामुळे अभिनेता सलमान खान यांनी #बिश्नोई कम्युनिटीची माफी मागावी हाच एक आता उपचार आहे.
अभिनेता सलमान खान हा महाराष्ट्रातील राजकीय पक्षाच्या जवळचा राहिलेला आहे तसेच अनेक माध्यमातून सलमान खानला ओळखले जाते परंतु सध्याची परिस्थिती पाहता अभिनेता सलमान खान यांचे भूतकाळामध्ये घडलेल्या अनेक असे कृत्य की ज्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. व याला सर्वस्वी संबंधित सुद्धा जबाबदार आहे.. किती वेळा तरी अभिनेता सलमान खानच्या सुरक्षा कवचामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
कारण या खुलेआम हत्या मधून असे दिसून येत आहे की, बॉलीवुड स्टार सलमान खानला जो मदत करेल, जो सपोर्ट करेल त्याला खुलेआम ठोकला जाईल.. असे आजच्या परिस्थितीवरून वाटत आहे. मग तो राजकीय पक्षाचा कोणी सुद्धा असू दे किंवा बॉलीवूड स्टार असो किंवा कोणी सुद्धा असू दे याचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे कितीही सुरक्षा असली तरी त्या व्यक्तीला ठोकला / मर्डर / शूट केला जाईल असे यावरून दिसते.
तुम्ही काहीही करता पण महाराष्ट्राला याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भोगावे लागत आहे…. तुमचे अंतर्गत संबंध कसे आहेत ? आम्हाला माहित नाही, महाराष्ट्राला माहिती नाहीं ? परंतु तुमच्या अशा वागण्यामुळे महाराष्ट्र धोक्यात सापडलेला आहे.. महाराष्ट्र मध्ये जे गॅंगवॉर घडत आहे, बाहेरच्या राज्यातील परप्रांतीयांचा वापर करून महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करण्याचा महाराष्ट्रातीलच व महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तींनी क्रूरकर्म चालविली आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्र गॅंगवॉर ची भूमी झालेली आहे, जिथे कोणतेही कंट्रोल राहिलेले नाही. महाराष्ट्रातील नागरिक तसेच अडचणीत सापडलेला महाराष्ट्र मध्ये नेहमीच काहीतरी नवीन घटना पाहायला मिळतात, परंतु अशा घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत.
बिश्नोई कम्युनिटी बरोबर सलमान खानचे किंवा इतर बॉलीवूड किंवा राजकीय पक्षांमध्ये एकमेका बरोबर असलेले संबंध मधील काही त्रासदायक संबंध असतील तर त्यांनी बिश्नोई कम्युनिटी / समाजाची माफी मागावी. कारण काही व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पणे हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारत आहेत. तसेच नवीन हत्या करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून यासाठी मोठ्या प्रमाणात हत्यारे व युवकांचा वापर केला जात आहे.
कारण बिश्नोई कम्युनिटी या संदर्भात सोशल मीडिया वरती अनेक विषय घेतलेले आहेत. या विषयांमध्ये काळवीटाची हत्या करणे हा गुन्हा तर आहे, प्राण्यांची हत्या करणे हा गुन्हा आहे. बहुतेक प्राण्यांना समाजामध्ये देव मानले जाते.. त्यामुळे काळ्या हरणाची हत्या करणे, हा सर्वात मोठा गुन्हा तर आहेच याला बिश्नोई समाजामध्ये देव मानले जाते त्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.
आज मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. परंतु अशा घटनांमुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेइज्जत केले जात आहे. मुंबईला वाढवण्यासाठी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी बॉलिवूड स्टारची सुद्धा महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. परंतु आजच्या घडीला व परिस्थिती बघून मुंबई धोक्यामध्ये आहे, असे यावरून वाटते. मुंबईचा नागरिक सुरक्षित आहे का ? बॉलीवूड स्टार चे फार्म हाऊस, बंगलो वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. त्या गावांमध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी वाईट परिस्थिती उद्भवू शकते व तेथील नागरिकांना सुद्धा धोका आहे. व तेथूनच कोणीतरी व्यक्ती तयार होतो व असे क्रूर कर्म करण्यासाठी हत्यार उचलतो. आजच्या परिस्थितीमध्ये एखाद्या राजकीय व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागतो. कशामुळे माहिती नाही ? परंतु यामध्ये प्रॉपर्टीचे मॅटर, अंतर्गत किंवा जुने वाद असे अनेक कारणे असू शकतात .. परंतु अशा परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईला नाही तर महाराष्ट्राला भोगावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्यातील कारभारावरती व यंत्रणेवरती बोट ठेवले जात आहे तसेच संशयाच्या नजरेने बघितले जात आहे.परंतु यामुळे स्थानिक नागरिकांना याचा परिणाम भोगावा लागत आहे व मुंबईच्या नागरिक आता घाबरलेल्या अवस्थेत आहे असे यावरून वाटते.
*महाराष्ट्र मध्ये घडलेल्या परिस्थितीमध्ये म्हणजे वेदनादायी घटनेमध्ये महाराष्ट्र बाहेर व्यक्तीचा किंवा परप्रांतीयांचा कशाप्रकारे व पद्धतीने वापर करून महाराष्ट्र मध्ये बेधडकपणे गोळीबार करून महाराष्ट्र हा कशा पद्धतीने बेजबाबदार आहे, तसेच महाराष्ट्र मधील राजकीय पक्ष निर्जीव झालेले आहेत. महाराष्ट्र मध्ये पोलीस तसेच अनेक प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने फेल ठरत आहेत यावरती एक प्रकारचा ठप्पा लागताना दिसत आहे. आज कोणी सुद्धा येऊन मुंबई वरती महाराष्ट्र वरती राजकीय पक्षावरती, सुरक्षित कवच म्हणजे प्रशासकीय व पोलीस यंत्रणा यावर बोट ठेवत आहे. मोठमोठे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तसेच न्यूज चॅनेल, सोशल मीडियाला बाईट देऊन मुंबईचे व महाराष्ट्र दुर्लक्षपणा दाखवला जात आहे. महाराष्ट्र मध्ये कोणीही सुरक्षित नाही आहे असे दाखवले जात आहे.
बॉलीवूड असू दे किंवा कोणतीही व्यक्ती असू दे आपण काहीतरी दुष्कर्म करतो, आपल्या हातून काहीतरी कळत नकळत घडते, त्यावेळी माफी मागणे हे गरजेचे असते कारण यामुळे त्या समाजाला त्रास झालेला आहे. त्यांच्या भावना दुखावणे गेलेले आहेत ! या दुखावलेल्या भावना भरून काढण्यासाठी जे पाहिजे ते करायची इच्छा असणे गरजेचे आहे. कारण त्या समाजाची नाल त्या प्राण्यांशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे अशी काही परिस्थिती निर्माण झाली असेल तर अभिनेता सलमान खान यांनी बिश्नोई कम्युनिटीची माफी मागावी.
लॉरेन्स बिश्नोई किंवा संबंधित महाराष्ट्राला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत असेल व महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक असे मास्टर ब्लास्टर बसलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला कोणत्याही राज्याने ललकारू नये. नाहीतर त्याला तिकडेच ठेचला जाईल ! याची महाराष्ट्र मध्ये ताकद आहे.
काही कृत्य किंवा बेधडक कृत्य व समाजाला अशोभनीय व समाजाच्या विरोधात केले जाते / घडले जाते त्या त्यावेळी महाराष्ट्र मध्ये शासकीय प्रशासकीय यंत्रणांना जबाबदार ठेवले जाते. परंतु असे दुष्कर्म तुम्ही का करता ? की ज्याच्यामुळे एखाद्या समाजाला त्रास होईल व समाजाच्या भावना दुखावल्या जातील याचा परिणाम आपण पाहतच आहोत. अशी परिस्थिती महाराष्ट्रातील नागरिकांनी किती वर्ष भोगायचे.?
महाराष्ट्र मध्ये २४ तास पोलीस कार्यरत असते, परंतु ज्यावेळी मर्डर / खुलेआम हत्या केले जाते त्यावेळी पोलीस सुरक्षा कवच नसते किंवा बेसावध असतो.. असे अनेक आरोप यंत्रणेवरती काही व्यक्तीकडून / राजकीय पक्षाकडून व राजकीय नेत्याकडून तसेच अनेक स्तरावरून केले जात आहेत.. यंत्रणेचे नाव खराब झाले म्हणजे महाराष्ट्राचे सुरक्षा कवचला तडा गेली.. याचा अर्थ महाराष्ट्र मध्ये राजकीय पक्ष पासून ते गृह खाते निष्क्रिय झाले. मग प्रश्न येतो विश्वास कोणावर ठेवायचा..?
प्रत्येक वेळी बॉलीवूडच्या माध्यमातून तसेच अनेक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तसेच अनेक कॉर्पोरेट यांच्या माध्यमातून पोलीस सुरक्षितेचे मागणी केली जाते, पोलीस सुरक्षा वाय / झेड सुरक्षा अशा अनेक प्रकारच्या सुरक्षिततेची मागणी केली जाते, परंतु अशी मागणी केल्यावर समाज सुद्धा असुरक्षित आहे असे यावरून वाटते कारण, अशी घटना जर पब्लिक मध्ये घडली तर ज्याला सुरक्षा कवच दिलेले आहे तो वाचेल. परंतु आजूबाजूला दुर्घटना किंवा परिस्थिती वेगळी होऊ शकते संबंधित जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पब्लिक घाबरलेल्या अवस्थेत असतात..शाळा तसेच अनेक अशा व्यवस्थेला त्रास होत असतो.. याचे कोणीही विचार करताना दिसत नाही आहे.. फक्त मला सुरक्षा पाहिजे, मी कसा सुरक्षित राहील याचा विचार केला जातो.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा कवच घेण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा म्हणजेच दबाव तंत्राचा वापर केला जातो, यामध्ये राजकीय तंत्र वापरले जाते.. परंतु सगळ्यात जास्त धोका समाजाला आहे, तेथील व्यवस्थेला आहे. जे कोणी सुरक्षा कवचची मागणी करताना दिसत आहे अशी मागणीकर्त्यांनी समाजाचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या अंतर्गत वादामुळे किंवा अनेक अशा गोष्टीमुळे तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षा कवच दबाव तंत्राच्या साह्याने मागून घेतात. परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही त्या व्यवस्थेलाच ललकारता किंवा चुकीचे ठरवता. त्यापेक्षा असे गुन्हे अथवा परिस्थिती उद्भवू नये त्यासाठी तुम्ही जे काही परिस्थिती निर्माण करत आहात याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे.
आज जी परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये आरोपी महाराष्ट्र मध्ये फिरताना दिसत आहेत, टेहाळणी करताना दिसत आहे व मोका बघून बेधडकपणे पब्लिक मध्ये शूट करताना व ठोकताना दिसत आहेत. असे अनेक आरोपी ठिकठिकाणी राहत असतील किंवा तयार होत असतील परंतु याकडे सुद्धा महाराष्ट्र यंत्रणा पुन्हा एकदा दुर्लक्ष करत आहोत. जर असे आरोपी महाराष्ट्र मध्ये राहत असतील तर दहशतवाद्यांना सुद्धा आपण आमंत्रण देत आहोत, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने, पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणेने मजबूत तसेच अति सावध राहणे गरजेचे आहे . भविष्यामध्ये या उदाहरणाच्या सहाय्याने महाराष्ट्र मध्ये अति गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
लॉरेन्स बिश्नोईला काहीजण नथुराम गोडसे तर काहीजण शेर ऑफ इंडिया…! अशी उपमा दिली जात आहे. 90% जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स विष्णूला जे काही केलं ते चांगलं केलं… ‘भारत का शेर इंडिया का शेर’ अशी सुद्धा उपमा दिली जाते..कारण मागील काही अशा घटना महाराष्ट्र मध्ये घडलेले आहेत की, ज्याच्यामुळे बॉलीवूड वरती ज्याचा दबदबा होता तो दबदबा आता त्याच्या हातातून निष्ठत चाललेला आहे..यासाठी लॉरेन्स बिश्नोई यांनी जे केलं ते चांगलेच केलेले आहे अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून व लॉरेन्स बिश्नोई याच्यावरती मुक्ताफळे टाकली जात आहे.
शेवटी आता प्रश्न निर्माण होतो कोण खरे आणि कोण खोटे ? यामध्ये बॉलिवूड ज्याला भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा ओळखतात अशा सलमान खान याने असे कोणते वाईट कृत्य केले ? की ज्यामुळे मुंबई बांद्रा मधील, बाबासिद्दिकी यांना त्यांचा जीव गमवावा लागला. बाबासिद्दिकी हे राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित व नावाजलेले नेते होते.. बॉलीवूड स्टार ला घेऊन इफ्तार पार्टी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आतापर्यंत सहभागी होत आलेली आहेत. याची सगळ्या बॉलीवूड स्टार ला अशा घटनेनंतर आठवण झाली असेल, परंतु अशा काही नकारात्मक व सामाजिक स्तरावरती, राजकीय काही घटना घडलेल्या असाव्यात याचा परिणाम म्हणून लॉरेन्स बिश्नोई गॅंग ने बाबा सिद्दिकी यांची हत्या केलेली असावी ? परंतु हत्या केल्यानंतर सुद्धा काही व्यक्ती जबाबदारीपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज टाकून जबाबदारी घेतात… परंतु हे कधीपर्यंत चालणार आहे ? यावरती काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे, कारण शेवटी भारतामध्येच राज्य राज्यामध्ये फळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ज्या काही परिस्थिती तसेच घटना सलमान खान यांच्याकडून भूतकाळामध्ये घडलेल्या असतील त्या परिस्थिती वरती त्या समाजाची म्हणजेच बिश्नोई समाजाची माफी मागावी..अन्यथा अशा किती जणांचा बाबा सिद्दिकी प्रमाणे जीव जाणार आहे. व जीव घेणार आहेत व महाराष्ट्राला याचे परिणाम भोगावे लागणार आहे. अन्यथा या घटनेवरून असे वाटत आहे की, भविष्यामध्ये अशा घटना घडतच राहणार. जो कोणी सलमान खानच्या बाजूने किंवा आसपास दिसेल त्याला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. असेच काहीतरी संकेत देत आहे.. परंतु याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना तसेच महाराष्ट्र अशा घटनाला सामोरे जात आहे..
महाराष्ट्र हा जगामध्ये छत्रपती शिवरायांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओळखला जातो. त्याच महाराष्ट्रामध्ये खुलेआम अशा घटना होत असतील तर यावरती कोठेतरी फुल स्टॉप देणे गरजेचे आहे.
परंतु अशा लोकांना महाराष्ट्राने का पाळायचं ? ज्यामुळे महाराष्ट्राच्या नावाला डाग लागण्याचा व अनेकांच्याकडून बोट ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती म्हणजे VOTE बँक ! परंतु अशामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.. ही खरी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.
आपण नेहमी काही झाले तरी कोणतेही सरकार असू दे परंतु, जो मारतो किंवा जो ठोकतो किंवा जो कोणी सुद्धा असे कृत्य करतो की आपण त्याच्यावरती काहीतरी बोट ठेवत असतो त्याने कृत्य केले त्यामुळे त्याला आपण जबाबदार ठरत असतो, परंतु ज्याच्यामुळे हे कृत्य घडले त्याला आपण समजावणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याच्यावरती त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाचे खंडन न करता जे आरोप त्याच्यावरती झालेले आहेत ते पारदर्शक पद्धतीने समाजाच्या समोर आणून सुसंस्कृतपणे माफी मागणे सुद्धा गरजेचे आहे.. महाराष्ट्र हा जागतिक महापुरुषांची भूमी आहे त्यामुळे या भूमीमध्ये म्हणजेच महाराष्ट्राला कोणीही ललकारू नये.. जर असे कृत्य लॉरेन्स बिश्नूई किंवा दाऊद किंवा अजून जर कोणी महाराष्ट्रामध्ये असेल असे वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत असेल तर महाराष्ट्रामध्ये एक्सो एक आहेत, की जे छत्रपती शिवरायांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाला मानून महाराष्ट्रासाठी आपले जीव पणाला लावणारे मावळे महाराष्ट्र मध्ये आहेत व जो कोणी महाराष्ट्राचे नाव विद्रूप व तडा लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
महाराष्ट्र किती जणांना सुरक्षा कवच देणार आहे.. महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत आणि अशातच राजकीय क्षेत्रातच नाही तर बॉलीवूड क्षेत्रामध्ये सुद्धा मोठमोठे कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रत्येकाला सत्ता पाहिजे असते परंतु, या सत्तेपाई महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रकार घडताना दिसत आहे.
महाराष्ट्र मध्ये मागील काही वर्षापासून अनेक असे विद्रूप घटना घडलेल्या आहेत की, ज्यामुळे महाराष्ट्र बाहेरील तसेच राज्यातील तसेच महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या युवकांमध्ये १९ वर्षापासून ते ३० वर्षापर्यंत मर्डर करण्यासाठी यांचा वापर केला जात आहे.
अभिनेता सलमान खान यांनी बिश्नोई समाजाची झालेल्या प्रकाराबद्दल खरोखरच व आदरपूर्वक माफी मागावी व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून द्यावे. कारण देशाच्या अंतर राज्यामधील वाद हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती चव्हाट्यावर पोहोचलेले आहेत. यामुळे भारतीय नागरिक म्हणून सामंजस्याची भूमिका घ्यावी.
परंतु नेहमी असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो खरोखरच या सगळ्या पाठी लॉरेन्स बिश्नोई चा हात आहे का ? अजून कोणी याच्यापाठी आहे, कारण ज्या पद्धतीने अंडरवर्ल्ड दाऊद टोळीने मुंबई वरती राज्य करण्याचा प्रयत्न केला होता, तो यशस्वी झालेला नाही व आता यशस्वी करण्याच्या नादामध्ये पूर्ण भारत देशाला पोखरण्याचा त्याचा प्रयत्न त्याने चालू केलेला आहे. त्यामुळे अशा काही घटना घडवून आणू शकतो, याची चेतावणी सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना व बॉलीवूडला तसेच सरकारला देत असावा.
महाराष्ट्र सरकारला विनंती पुन्हा एकदा २६ / ११ परिस्थिती उद्भवू शकते ! हे नाकारू शकत नाही. कारण ज्या प्रकारे परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये खुलेआम हत्या केली जाते व या हत्या मागे तरुणांचा वापर केला जातो, रेकी केली जाते हे आरोपी परप्रांतीय तसेच स्थानिक नागरिकांच्या, युवकांचा वापर करण्यावर यांचा भर आहे, स्थानिक नागरिकांचा वापर करून भाडेतत्त्वावर राहण्याची सोय केली जाते. परंतु स्थानिक पोलीस स्टेशनला व गृह खात्याला याची कोणतीही माहिती नसते यासाठी काहीतरी ठोस उपाय करणे गरजेचे आहे.
लॉरेन्स बिश्नोई ज्या पद्धतीने भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातील तरुणांचा वापर करून देशद्रोह सारख्या घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे व यामध्ये तो तरुणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वापर करून घेत असेल तर त्याला कोणतेही सहानुभूती राहिलेली नाही, अशा घटना घडल्यानंतर त्या गरीबाच्या मुलाला पकडले जाते, कस्टडीमध्ये टाकले जाते व त्याच्यावरती अनेक गुन्ह्याची नोंद केली जाते व प्रत्येक अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना जबाबदार ठरवले जाते.
अपमानाचा बदला घेण्यासाठी हे करत असेल तर त्याने त्याचा स्वतःच्या समाजाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या समाजाच्या युवकांचे प्राण व भविष्य पणाला लावू नये.
मध्यंतरी लॉरेन्स बिश्नोई याने राजस्थान मधल्या बिकानेर मुक्तिधाम मंदिरात येऊन सलमान खानने समाजाच्या देवासमोर माफी मागावी अशी मागणी मुंबई पोलिसांपर्यंत करण्यात आली होती, खरोखरच ही मागणी केली होती का ? परंतु याचे काय झाले ? ही माहिती सलमान खान पर्यंत पोहोचली का ?
1998 ‘हम साथ साथ है ‘ या चित्रपटाचे चित्रीकरण जोधपुर मध्ये सुरू होते. यावेळी सलमान खानने व त्याच्या सहकलाकारांनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यानंतर बिश्नोई समाजाने काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासूनच बिश्नोई समाजाचा सलमान खानवर राग आहे, त्यावेळी लॉरेन्स बिश्नोई हा पाच वर्षाचा होता व सलमान खानच्या अशा कृत्यामुळे हा राग लॉरेन्स च्या डोक्यात होता. बिश्नोई समाज हा प्राणी तसेच निसर्गाला सुद्धा देव मानतो व तसेच झाडाची पानं, फुलं प्राण्यांपर्यंत अनेक निसर्गामध्ये येणाऱ्या निसर्गाच्या देणगीची सुरक्षा व संवर्धनासाठी ते प्रयत्न करीत असतात. परंतु काळवीटाला या समाजामध्ये फारच जास्त महत्व आहे. जर एखाद्या काळविट मृत्यू झाला तर त्याच्या बच्चूला बिश्नोई समाजामध्ये माता स्वतःच दूध पाजतात.. खरोखरच प्राण्यांना कशा प्रमाणे म्हणजे ते स्वतः मातृत्व स्वीकारतात.. विशेष म्हणजे काळवीटाला या समाजामध्ये देव मानतात.
परंतु आता असा प्रश्न निर्माण होतो काळवीटाला ते देव मानतातच. परंतु निसर्गाला सुद्धा ते देव मानतात त्या निसर्गामध्ये मनुष्य सुद्धा आहे, प्राणी सुद्धा आहे वनस्पती सुद्धा आहे.. मग हा मनुष्य स्वतःच्या अन्न, वस्त्र, निवारासाठी, आर्थिक लाभासाठी, स्वहितासाठी, सामाजिक भूमिका नाही असा मनुष्य आता समाजामध्ये वावरताना दिसत आहे, हा मनुष्य प्राण्यांना तर मारतोच, परंतु मोठ्या प्रमाणात निसर्गाची सुद्धा हानी / हत्या पोहोचवत आहे. मग अशावेळी लॉरेन्स बिश्नोई अशा किती मनुष्याची हत्या करणार आहे..?
बाबा सिद्दिकी हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लॉरेन्स बिश्नोई गॅंग नावाचा प्रचार केला जात आहे. असो, एका हाताने टाळी वाजत नाही. या हातांचा दुसराच कोणीतरी स्वहितासाठी वापर करत आहे.
🔲विकास पवार
+९१-८८७९०१५१३६
पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक.
#salman
#salmankhan #salmankhanfans #Bollywood
#Lawrencebishnoi
#crime
#Bollywoodfans
#bigboss
#MunawarFaruqui