ताज्या बातम्या

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले

सकल जैन श्री संघाची बैठक संपन्न ; तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणार

जळगाव (दि.९) – भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव जैन धर्मीयांतर्फे दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह दि. २, ३ व ४ एप्रिल २०२३ दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात येईल. भव्य महोत्सवाच्या नियोजनासाठी सकल जैन श्री संघाचे आधारस्तंभ सुरेशदादा जैन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समाजबांधवांची बैठक उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सर्वानुमते भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले यांची निवड करण्यात आली.दादावाडी जैन मंदिराच्या सभागृहात झालेल्या समाजबांधवांच्या सभेला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, साै. रत्नाभाभी जैन, श्रीमती नयनतारा बाफना, राजेश श्रावगी जैन, ललीत लाेडाया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, विजय चाेरडिया, प्रदीप मुथा, दिलीप गांधी, भारती रायसाेनी, स्वरुप लुंकड, राजकुमार सेठिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमूते विनाेद ठाेले यांची भगवान कल्याणक महोत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महोत्सव ऐतिहासिक यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या जातील. ‘भारतात जैन समाजात श्री संघीय कार्यासाठी जळगावचे नाव सुप्रसिध्द आहे. पूर्वजांनी घेतलेल्या अथक सांघिक परिश्रमामुळे हे शक्य झाले. तीच आदर्श परंपरा जोपासल्यास समाजात एकता, सलोखा कायम ठेवत आपला आदर्श देशातील सर्व श्री संघ घेतील. सर्वांनी एकदिलाने सहकार्य करूया, जन्मकल्याणक मनवू या असे आवाहन करत युवकांनी आपआपसात उत्तम समन्वय साधत समाज कार्यात आपले योगदान द्यावे, त्यायाेगे जैन दर्शन, धर्माची सेवा करण्याचे आवाहन सभाध्यक्ष सुरेशदादा जैन यांनी केले. याप्रसंगी अशाेक जैन, प्रदीप मुथा यांनीही मार्गदर्शन केले. सभेस अनिश शहा, अतुल सतिषदादा जैन, पारस रांका, अमर जैन, विजया मलारा, पुष्पलता बनवट, जयेश कामानी, विजय चाेपडा, विजय सांड, विजय खिवसरा, किशाेर भंडारी, धमेंद्र जैन, अजय राखेचा, निता जैन, आनंद चांदीवाल, चंद्रकांता मुथा, निलिमा रेदासनी, नम्रता सेठिया, सुलेखा लुंकड, स्नेहलता सेठिया, नलिनी जैन, पियुष संघवी, नरेंद्र बंब, संजय रेदासनी, विशाल चाेरडिया, नितीन चोपडा, अजित काेठारी, प्रविण पगारीया, रिकेश गांधी, ज्याेती काेटेचा, ललिता चाेरडिया, ज्याेती ललवाणी, प्रशांत पारख, किशाेर भंडारी, मनिष लुंकड, सुधीर बांझल, सचिन चाेरडिया, अपुर्वा राका, श्रेयस कुमट, अनिल पगारीया, उदय कर्नावट आदि कार्यकर्ते उपस्थित हाेते. यांच्यासह समाजातील सर्व महिला मंडळ, युवा मंडळ, विविध मंडळांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थीत होते. सभेचे सूत्रसंचलन स्वरूप लुंकड यांनी केले.*विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी* भगवान महावीरांनी ‘अहिंसा’ हा दिव्य-संदेश जगाला प्रखरपणे दिला व त्याकाळी विविध अनाकलनीय रुढी, परंपरा त्यांनी हद्दपार केल्या. मानवी जीवन अधिक सुकर करत त्यांनी माेक्ष प्राप्तीसाठी मार्ग दाखविला. वर्तमानात महात्मा गांधींनी ‘अहिंसा’ हे महान तत्व केद्रस्थानी ठेवत भारत या विशालकाय देशाला पारतंत्राच्या जाेखडातून मुक्त केले व स्वतंत्रता मिळवून दिली. हाच महत्वाचा संदेश विविध कार्यक्रमांतून देण्याचा मानस नवनियुक्त अध्यक्ष विनोद ठोले यांनी व्यक्त केला.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव दि. २, ३ व ४ एप्रिल असा तीन दिवस असेल. मुख्य कार्यक्रम दी. ४ रोजी होईल. शोभायात्रा (वरघोडा), समाज प्रबोधनपर विविध स्पर्धा, सामाजीक संदेशपर नाटिका, भगवान महावीरांच्या जीवनावर प्रसिद्ध वक्ता तर्फे भाषण, प्रभूंचे जीवन दर्शन, रक्तदान, आराेग्य सेवा जागृती आदी कार्यक्रमांसह समाजातील महिला व लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल अशा प्रबाेधनपर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व युवा मंडळ, महिला मंडळ व सकल जैन श्री संघाचा सिंहाचा वाटा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *