ताज्या बातम्या

भवरखेडे, विवरे गावावर राहणार आता सीसीटीव्हीचा वॉच

भवरखेडे येथे चार तर विवरे येथे दोन सीसीटीव्ही द्वारे गावावर तगडी नजर

प्रतिनिधी:अजय बाविस्कर.

धरणगाव: तालुक्यातील भवरखेडे,विवरे येथील ग्रामपंचायतीने बसस्थानक, बाजारतळ, भवरखेडे धरणगाव मार्ग व भवरखेडे पारोळा मार्ग, भवरखेडे एरंडोल मार्ग, विवरे धरणगाव मार्ग या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे गावामध्ये वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण, टवाळखोरी, छेडछाड व मद्यपींचा वाढलेला उच्छाद यासारख्या प्रकारांना आळा बसणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
बऱ्याच दिवसापासून भवरखेडे,विवरे ग्रामस्थांची सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे संदर्भात मागणी होती. त्याची दखल घेत तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भवरखेडे, विवरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता गावात अन्य प्रकारांवर आळा बसण्यास मदत मिळणार असल्याचे सरपंच रेखा विजय सूर्यवंशी व उपसरपंच शोभा दिलीप पाटील यांनी सांगितले.सीसीटीव्हीची निगराणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरात घडणाऱ्या घटनांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवता येणार असून, चोऱ्या, टवाळखोरी, दारू पिऊन धिंगाणा घालणे यासह अस्ताव्यस्तपणे गाड्या पळविणे या सारख्या घटनांना मोठ्या प्रमाणात लगाम लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *