भारतीय जवानांनी एकमेकांना राख्या बांधून केला आनंद साजरा ; चिमुकल्यांनी झाडाच्या बीज पासुन बनवलेल्या राखीचे कौतुक

भारतीय जवानांनी एकमेकांना राख्या बांधून केला आनंद साजरा
एक राखी जवानों के नाम” या उपक्रमांतर्गत सीमेवर सुंदर आकर्षक राख्या पोहच
नांदगाव ✍️लोकनायक न्यूजसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी
भारताचे जवानांना रक्षाबंधना निमित्त शाळेसह विद्यार्थी विद्यार्थीनी शाळेमध्ये”एक राखी जवानों के नाम” या उपक्रमांतर्गत सीमेवर सुंदर आकर्षक राख्या पोहच करून जवानांचे मनोबल वाढवले होते.भारत देशाच्या प्रत्येक शहरातील,गावाच्या,ग्रामीण भागातील मातीच्या सुंगधाची ओढ असलेले भारतीय जवानांना या चिमुकल्याची आठवण राहावी म्हणुन शाळेचे संचालक संजय बागुल आणि सरीता बागुल यांनी या संकल्पने द्वारे मुख्याध्यापिका नटराजन यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावर्षी शाळेने एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन अनियमित पडणारा पाऊस,ऑक्सिजनची कमतरता,पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास,या सर्व समस्यांचा एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने विविध झाडांच्या बीज पासुन राख्या बनवून त्या एकमेकांना बांधल्या त्याच बरोबर सीमेवरील जवानांना देखील पाठविल्या होत्या.
विद्यार्थ्यांच्या या अनोख्या राख्या जवानांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिमाचल प्रदेश,नहाम येथे कार्यरत असलेले वन प्यारा स्पेशल फोर्सचे जवान रोहित देवराम जगधने तसेच दिल्ली येथे कार्यरत असलेले मेजर भगवान रामभाऊ वडवळ यांचे सहकार्य लाभले होते.
या जवानांनी राख्या आपल्या बटालियन समूहात सर्व जवानांना बांधून विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे मनापासून खूप कौतुक केले त्याच बरोबर जवानांनी राख्या सोबतचे अनमोल क्षणांचे फोटो शाळेसोबत शेअर करत आनंद व्यक्त करतांना या अविस्मरणीय छाया चित्रात टिपलेले हेच ते क्षण पाठवले आहेत.


