धरणगाव शहर

मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली दखल ; स्वखर्चातुन केली रस्त्याची दुरुस्ती

धरणगांव – शहराला लागून असलेल्या कॉलनी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर मोठ मोठी डबकी साचली होती. येणाऱ्या जणाऱ्यांना यातून बिकट मार्ग काढावा लागत होता. तर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कुणीच वाली नसल्याची बातमी ‘लोकनायक न्युज’ ने प्रसारित केली होती. या बातमीची जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दखल घेत रस्त्याची दुरुस्ती केली.

‘श्री चिंतामण मोरया नगर’ येथे आजच्या स्थितीत ना ग्रामपंचायत सुविधा देत, ना नगरपालिका सुविधा देत. कुणीही वाली नसल्याची परिस्थिति या ठिकाणी आहे. रस्त्यावर डबके सचल्याने पादचारी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी ,लोकनायक न्युज, ने प्रसारित करताच बातमीची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ स्व:खर्चातुन या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली. रस्त्याची डागडुजी झाल्याने ‘श्री चिंतामण मोरया नगर’ परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

सदर रस्त्याच्या कामी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विलास महाजन, पवन महाजन, प्रशांत देशमुख, रोहित अग्निहोत्री, ललित मराठी, चेतन पाटील, महाले साहेब, धनराज महाजन, पाटील भाऊसाहेब आदींनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *