मक्याच्या शेतात नेत १९ वर्षीय नारधमचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
चोपड्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार शहर पोलिसात गुन्हा दाखल ; आरोपीस अटक
चोपडा तालुक्यातील एका गावात आदिवासी समाजातील बारा वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी सौरव महेंद्र पाटील दि 23 ऑगस्ट रोजी दुफारी 12 ते 2 वाजेचा दरम्यान गावातील महाविद्यालया जवळील मक्याच्या शेतात बारा वर्षीय आदिवासी मुलीचा हात धरून मक्याच्या शेतात घेऊन जाऊन अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.2023 चे कलम 64(1), 351 (2) (3), तसेच अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 1989 चे कलम 3(1)(W)(i)(ii), 3(2) (v) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8 प्रमाणे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहेत.