मजरेहिंगोणा जि.प.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी विनायक पाटील
जि.प.उच्च प्राथमिक शाळा मजरेहिंगोणे ता.
चोपडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमापूर्वी शाळेतील वर्षभरात राबवलेल्या सहशालेय उपक्रमांतर्गत विविध स्पर्धेत प्रथम, व्दितीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देवून त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीमती दिपालीताई बाविस्कर यांनी भुषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे यांचेसह मा.सभापती तुकाराम बाविस्कर, गावाच्या सरपंच कल्पना पाटील ,लासुर केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील,रविंद्र पाटील,प्रदीप पाटील ,साहेबराव पाटील,मुरलीधर माडे,ग्रामसेवक कांतीलाल कोळी,प्रमोद सुर्यवंशी, विवेकानंद धनगर , सुरेश बाविस्कर शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रिना भिल,विजय धनगर,जयसिंग सोनवणे, शितल पाटील,माया पाटील ,ज्योती वानखेडे ,प्रियंका पावरा,निता अहीरे, यांचेसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थीत होते.सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्ती,विविधतेतून एकता,भारतीय संस्कृती, नाट्यीकरण संवाद- शामची आई तसेच व्यसनमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या, हुंडाबळी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग,स्वच्छता मिशन, कला, गायन ,नृत्य यांत विद्यार्थ्यांंनी केलेले कार्यक्रम बघून प्रेषक मंत्रमुग्ध झाले. यावेळी लासुर केद्राचे केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांनी शाळेचे नियोजन वर्षभरातील विविध उपक्रम याबाबंत शिक्षक व विद्यार्थी यांचे बक्षीसासह कौतुक केले.प्रास्ताविक शाळेचे पदवीधर शिक्षक व ग.स,चे संचालक योगेश सनेर यांनी केले तर सुत्रसंचलन शाळेच्या मुख्याध्यापक वैशाली पवार यांनी केले.कार्यक्रमाचे आभार मोनेश बाविस्कर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे धनराज बोरसे ,प्रमोद पाटील मौजेहिंगोणा तसेच गावातील मनोहर बाविस्कर ,भुषण पाटील मामलदे येथील सोनाली साळूंखे व दिप्ती सनेर यांनी देखील प्रयत्न केले.