ताज्या बातम्या

‘मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है’ ; शिंदे गटाच्या नेत्याचा हा डायलॉग गाजतोय महाराष्ट्रभर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यत्वे शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेनिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये सभेचे आयोजन करण्यात येत असून मान्यवरांची भाषणे या सभांमध्ये गाजत आहेत. नुकतीच पाटस, तालुका दौंड येथे ही सभा संपन्न झाली.

9 ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे. येणाऱ्या विधानसभेत महायुतीला हरविण्यासाठी ही यात्रा महाराष्ट्रातील पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांनी या यात्रेदरम्यान, शिंदे गटाचे उपनेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा डायलॉग प्रत्येक सभेदरम्यान गाजविला आहे. 

त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. . . .

“आता ही बाप बादलणाऱ्यांची टोळी आहे. या टोळीतील एक शिंदे गटाचा माणूस आहे. तो सारखं शेरो शायरीत सांगायचा की,

“कतलिया कही साप बदल लेते है | पुण्य के आड मे पाप बदल लेते है |

मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है |” आता ही सगळी बाप बादलणाऱ्यांची टोळी झाली.

अश्या प्रकारे या डायलॉग चा वापर करून फुटलेल्या आमदारांना लक्ष केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Whatsapp group