महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या गटनेतेपदी विलास रामा महाजन यांची निवड

तर प्रतोद पदी गुलाब नारायण मराठे यांची निवड
धरणगांव – नुकत्याच झालेल्या पालिका धरणगाव नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक श्री.विलास रामा महाजन तर प्रतोद पदी नगरसेवक श्री.गुलाब नारायण मराठे व उप-गटनेते पदी नगरसेवक तौसिफ पटेल यांची निवड करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
धरणगाव महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या वतीने गट स्थापन करण्यात आला. या गटाच्या गटनेतेपदी विलास रामा महाजन यांची तर प्रतोद पदी गुलाब नारायण मराठे यांची निवड करण्यात आली. याबाबत अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या कार्यालयात गटनेते आणि प्रतोद यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रसंगी महाराष्ट्र जनविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल मंत्री गुलाबराव पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी गटनेते पपू भावे, भाजपचे भगवान महाजन, शिरीष बयस, Advocate संजय महाजन, Advocate कन्हैया रायपुरकर, दिनेश पाटील, दिलीप महाजन, कडू आप्पा बयस, ललित येवले, भूषण कंखरे, शिवसेनेचे पी.एम.पाटील सर, विजू महाजन, Advocate शरद माळी, किशोर बापू कंखरे, संजय चौधरी, भानुदास विसावे, वासुदेव चौधरी, बुट्या पाटील, रविंद्र कंखरे, पवन महाजन, बुटा महाजन, वाल्मिक पाटील, सोनू महाजन, धिरेन्द्र पुरभे, पपू कंखरे, राष्ट्रवादीचे दिपक वाघमारे, हाजी इम्ब्राहीम यांच्या सह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.



