महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन
जळगांव – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कासोदा वखार केंद्र आणि धरणगांव वखार केंद्र अंतर्गत “वखार आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन सर्व शेतकर्यांसाठी करण्यात आले आहे. वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल साठवणुकीसाठी वखार पावती योजना, वखार पावती तारण योजना आणि इतर सुविधा या बाबतची एक दिवसीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय, पुणे व विभागीय कार्यालय, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले आहे.
रिंगणगाव, ता. एरंडोल येथे दि. २१ नोव्हेंबर २०२३ वार मंगळवार रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता राम मंदिर रिंगणगाव
फरकांडे, ता.एरंडोल येथे दि. २२ नोव्हेंबर २०२३ वार बुधवार रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता ग्राम मंदिर फरकांडे
होळ व कल्याणे, ता. धरणगांव येथे दि. २३ नोव्हेंबर २०२३ वार गुरुवार रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय कल्याणे व संध्याकाळी ०६.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय होळ
पिंपळकोठा, ता.एरंडोल येथे दि. २४ नोव्हेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता भवानी माता मंदिर पिंपळकोठा
येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी गावातील व आजू बाजूच्या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन गावाचे सरपंच, वि. का. सोसायटी चेअरमन व धरणगांव वखार महामंडळाचे साठा अधिक्षक यांच्या वतीने करण्यात येत आहे.