मालापूर धरणात एका तरुणांचा बुडून मृत्यू
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
तालुक्यातील मालापुर धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या तरुणाचे नाव शेख रियाज शेख रहीम (वय १६,) असून तो त्याच्या काका व भावांसह धरणात माशांसाठी चणे टाकण्यासाठी गेला होता. पाण्यात आंघोळ करीत असताना पाण्यात बुडून मृत्यू पावला आहे. त्याचा मृतदेह चोपडा उपजिल्हारुग्नालयात शव विच्छेदन साठी आणण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,शहरातील काझी मोहल्ला भागातील रहिवासी शेख रियाज शेख रहीम ,शेख जुबेर शेख रहीम ,शेख असद शेख रहीम,हे तीन भाऊ व रफिक शेख रऊफ असे चार जण हे मालापुर धरणावर गेले होते. मयताची आई नजमाबी हीचे ४० दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईचे उत्तर कार्य आटोपून धर्माच्या प्रथेनुसार धरणाच्या पाण्यात माशांना चणे टाकण्यासाठी गेले होते
माशांना चणे टाकून धरणाच्या पाण्यात आंघोळ करीत असतांना अचानक शेख रियाज शेख रहीम हा खोल पाण्यात गेल्याने तो बुडून मृत्यू पावला आहे.