मालेवातील लहान चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत निवेदन

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे
डोंगराळे तालुका मालेगाव येथील लहान चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल धरणगाव येथील श्री अखिल भारतीय संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री पवार साहेब यांच्याकडे जाहीर निषेध निवेदन देण्यात आले, निवेदनात नमूद करण्यात आले आहे की घटनाही खूप निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी इ, सदर अत्याचार पिडीतग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने त्वरित आरोपीस पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तथा ही घटना कोर्टामार्फत फास्टट्रॅकवर देऊन आरोपीस कठोर शिक्षा व्हावी करावी ,नाहीतर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विनायक महाजन यांनी मागणी केली,
याप्रसंगी संघटनेचे तालुकाप्रमुख दिनेश महाजन ,सामाजिक कार्यकर्ते तेजस राजेंद्र महाजन ,जॉनी महाजन, शुभम महाजन ,सुरज सूर्यवंशी ,सुधाकर साळुंखे, विकी चौधरी, निलेश महाजन, उमेश भोई, सुनील पावरा ,गणेश भोई ,कनैया माळी ,कमलेश पाटील सोबत समाज बांधव उपस्थित होते,


