मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन द्या ; प्रशिक्षणार्थीनि दिले पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन

जिल्ह्यातील 7000 तरुणांवर बेरोजगारी ची टांगती तलवार
धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थीनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व खासदार स्मिता ताई वाघ यांना निवेदन देऊन आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना तात्कालिन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मार्फत सुरू करण्यात आली होती ११ महिने प्रशिक्षण देण्यात आले होते आता या प्रशिक्षणार्थ्यांची कार्यकाळ संपलेला आहे त्या संदर्भात सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जळगांव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील व स्मिताताई वाघ यांना निवेदन दिले व आम्हाला सर्वांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. तसेच यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे 7000तरुणांवर बेरोजगार चा प्रश्न निर्माण झाला आहे अश्या विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले
यावेळी उपस्थित विनोद रोकडे , भूषण पाटील, जिगर पुरभे,शाम पवार भोणे, अविनाश जाधव, अनिल बडगुजर, गोपाल चौधरी, चेतन कोळी रुषभ वाघ, अजय कोळी सह मोठ्या संख्येने प्रशिणार्थी उपस्थित होते
रोजगार न दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बहिष्कार टाकू
शासनाने युवा प्रशिक्षणार्थ्यांना अस्थायी रोजगार उपलब्ध करून दिला. आता युवा प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी संपलेला आहे. प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित विभागात काम केल्याचा अनुभव आलेला आहे. याचा विचार करून प्रशिक्षणार्थ्यांना त्याच विभागात काम करण्याची संधी द्यावी.
विनोद सुरेश रोकडे, युवा प्रशिक्षणार्थी