मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव : आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा उपजिल्हाध्यक्ष संजय भाऊ महाजन, भाजपाचे ज्येष्ठ नेते आबासो पीसी पाटील, भाजपाचे ज्येष्ठ आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलेश दादा तिवारी, भाजपा तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन भाऊ पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आदरणीय कैलास माळी सर, सुनील भाऊ पाटील, कन्हैया भाऊ रायपूरकर, गोपाल भाऊ पाटील, दिलीप भाऊ महाजन, पुनीलाल महाजन, हेडगेवार ग्रामपंचायत सरपंच, भाजपा युवा मोर्चाचे योगेश भाऊ महाजन, उपस्थित होते. दीपक महाजन भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष यांनी रक्तदान केले.