म्हसावदच्या तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

प्रतिनिधि – विनोद रोकडे
जळगाव : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शुक्रवारी म्हसावद येथील काही तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. श्री.देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.
जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे हात बळकट करण्याकरीता पुढे आलेल्या तरूणांची भूमिका विधानसभेच्या निवडणुकीत खूप मोलाची ठरणार आहे. महाविकास आघाडीची ध्येय व धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाला तुमची मदत लागणार आहे, असे गुलाबराव देवकर तरूणांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी दापोरा येथील नाना सोनवणे, म्हसावदचे ग्रामपंचायत सदस्य विवेक चव्हाण, दिनेश कलाल, बिलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
मुकेश कोळी, सुदर्शन कंखरे, गोपाल कोळी, अजय मोरे, गणेश शिरसाठ, नथ्थू कंखरे, विकास पाटील, यशवंत केदार, शांताराम साळुंखे, नितीन कोळी, अनिल शिवदे, अल्ताफ मोमीन, यश मोरे, दीपक कोळी, समाधान सोनवणे.
 
					 
					

