रावेर तालुक्यातील खानापूर येथे कानिफनाथ महाराजांचा भव्य यात्रोत्सव संपन्न
रावेर (प्रतिनिधी)- कमलेश पाटील
रावेर – तालुक्यातील खानापूर येथील श्री कन्हैयालाल महाराज देवस्थान मंदीरात कानिफनाथांचा यात्रा महोत्सव सोहळा दिनांक 30 रोजी पार पडला.
पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दिवस दर्शन घेत कन्हैयालाल महाराज देवस्थान मंदीरात माघ शुद्ध प्रतिपदेला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी करत दिवस भर श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचा दर्शन घेत भव्य यात्रोत्सव सोहळा पार पडला तर सायंकाळी बस स्थानक वर असलेल्या भगतवृंदाचा समाधीस्थळावर रिंगण सोहळा पार पडला .
तसेच रात्री 9वाजता गावातील कन्हैयालाल महाराज देवस्थान मंदीरा समोरच पेटत्या आकाश गेंदमाळा खाली भगतवृंदाचा पृथनृत्य सोहळा वाद्यांचा गजर करत संपन्न झाला व नंतर पंगतीत लावत केळीच्या पानावर रिद्धी सिध्दी युक्त तयार केलेल्या केवट वरण व भाजलेल्या बट्टी च्या पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी खानापूर गावातील सर्व ग्रामस्थांनी परिक्षम घेतले तसेच रात्री उशिरापर्यंत रावेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त राखला.