ताज्या बातम्या

रावेर तालुक्यातील वाघोड येथे ‘दुर्गा देवी’ मुर्तीची स्थापना

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील

तालुक्यातील वाघोड येथील माजी सरपंच लक्ष्मीकांत महाजन यांच्या पुर्व संकल्पनेतून वडील कै. विठोबा महाजन यांच्या नावाने असलेल्या विठ्ठल नगर येथील गावढाण जागेवर लोकवर्गणीतून विठ्ठल नगर वासिय यांनी घेतलेल्या पुढाकारातून भव्यदिव्य असं मंदिर उभारून आज त्यात श्री दुर्गा देवी मुर्ती ची विधीवत पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे.
यासाठी 19 फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी मुख्य मार्गावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या वही मंडळाने वाजत गाजत गणेश मुर्ती भैरवनाथ मुर्ती व दुर्गा देवी मुर्ती ची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. 20 फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळ पासून होमहवन व पुजेचा कार्यक्रम पार पडला.व आज 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत मुर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा वाघोड गावाचे माजी सरपंच लक्ष्मीकांत महाजन तसेच सुपुत्र कुलदिप महाजन, व सौरभ महाजन या जोडप्यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला.
नंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसाद म्हणून नगर भोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यासाठी विठ्ठलनरवासिय तथा गावातील मंडळीनी अर्थक मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *