रावेर पोलिस स्टेशन ने घडवलं सामाजिक सलोख्याचे दर्शन
रावेर (प्रतिनिधी) – कमलेश पाटील
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशन मार्फत सामाजिक सलोखा व सर्व धर्म आणि समभाव जनतेच्या मनात रुजवण्यासाठी एकता क्रिकेट कप २०२५ या उपक्रमात करण्यात आला.
रावेर येथील कला वाणिज्य महाविद्यालय येथील मैदानावर क्रिकेट कप सामन्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात तालुक्यातील रसलपूर येथील राॅयल संघ, वाघोड येथील वॉरियर्स संघ, रावेर येथील टायगर्स संघ, पाल येथील राॅयल संघ, केऱ्हाळा येथील फायटर्स संघ व होमगार्ड पोलिस पाटील पत्रकार अशा एकूण सहा संघांनी भाग घेत अंतिम सामन्यात रसलपूर रॉयल बरोबर वाघोड येथील वॉरियर्स संघावर विजय पटकावत २०२५ क्रिकेट कप जिंकला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते तसेच फैजपूर उपविभागीय साहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह , रावेर तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी खेमचंद्र वानखेडे आणि सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावत क्रिकेट बघितले.