रावेर येथे गिर गाईच्या पोटातून काढले लोखंडी खिळे, दगडांचे तुकडे व एक व दोन रुपये नाणं
डॉ रणजित पाटील यांची यशस्वी शस्त्रक्रिया
रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
रावेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रणजित पाटील यांनी गिर गाईच्या पोटातून लोखंडी खिळे,दगड, तसेच एक दोन रुपये नाणं शस्त्रक्रिया करून यशस्वी काढण्यात यश मिळवले.
रावेर तालुक्यातील श्री राम मंदिर संस्थान कुसुंबा येथील गौशाळेत असलेल्या गिर गाईच्या तब्येतीत बिघाड असल्याचे गौसेवकांच्या लक्षात येताच त्या डॉ रणजित पाटील यांना बोलावलं आपल्या अनुभवाच्या जोरावर तर्क लावत गाईच्या पोटाची शस्त्रक्रिया करून पोटात असलेल्या लोखंडी खिळे,दगडांचे तुकडे , तसेच एक व दोन रुपये चे नाणं बाहेर काढून गाईला जिवदान दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
रावेर तालुक्याला लाभलेले एम डी पदव्युत्तर डॉ रणजित पाटील पशुवैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असतांनाच गरज पडली जागेवर जाऊन पशूंना आजार व भावना जाणून घेत योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या डॉ रणजित पाटील हे जनसामान्यांच्या गुरेढोरे यांच्या साठी देवदूतच ठरत आहे.