रावेर लोकसभा क्षेत्र भाजयुमो ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” खा. रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत संपन्न…
प्रतिनिधी - उमेश कोळी
जळगाव : आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बुथ रचना मजबूत करण्याच्या दुष्टीने रावेर लोकसभा क्षेत्र भाजयुमो ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” आज मुक्ताईनगर येथील खासदार संपर्क कार्यालय येथे खा. श्री. रक्षाताई खडसे, भाजयुमो जळगांव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन व भाजयुमो बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्री. सचिन देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाली.सदर बैठकीत खा. श्री. रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत जळगांव व बुलडाणा जिल्ह्यातील उपस्थित भाजयुमो प्रमुख पदाधिकाऱ्यांना बुथ सशक्तीकरण तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच उपस्थित भाजयुमो पदाधिकाऱ्यांकडून त्यांना येणाऱ्या स्थानिक समस्या जाणून घेऊन, सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.
यावेळी खा. श्री. रक्षाताई खडसे यांच्यासह भाजयूमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजयुमो बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्री. सचिन देशमुख,भाजयुमो जळगांव सोशल मिडिया सहसंयोजक श्री.भरत सोनगिरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री.रावसाहेब पाटील, श्री.मंगेश पाटील, श्री.सागर भारंबे, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष श्री.अंकुश चौधरी, रावेर तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष श्री.विक्रम वरकड, यावल तालुकाध्यक्ष श्री.सागर कोळी, जामनेर तालुकाध्यक्ष (प्रभारी) श्री.सुभाष पवार व श्री.मयूर पाटील, नांदुरा तालुकाध्यक्ष श्री.प्रवीण मानकर, रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजयुमो तालुका प्रमुख पदाधिकारी, सरचिटणीस यावेळी उपस्थित होते.