रावेर लोकसभेच्या निवडणुकीत बी आर एस रणशिंगे फुंकणार ; विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान बाविस्कर यांची माहिती
चोपडा – प्रतिनिधी विनायक पाटील
रावेर आणि जळगाव मतदारसंघात बी आर एस ने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात कामगिरी करत शेतकरी संघटनेचे नेते नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात समन्वयक नेमून सदस्य नोंदणी विविध शासकीय योजनेचा लाभ वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी शासनाला धारेवर धरणारे शेतकरी संघटनेच्या अनेक नेत्यांनी बी आर एस ला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात बी आर एस ला वाढता प्रतिसाद बघता रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा बी आर एस मोठ्या ताकतीने लढवणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान बाविस्कर यांनी दिले आहेचोपडा मतदारसंघात संपुले गाव हे विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान बाविस्कर यांचे गावगावात ग्रामपंचायत निवडणूक लढवली तर चहार्डी गाव हे चोपडा तालुक्यात मोठे गाव असून महिला जिल्हाध्यक्ष कोमल ताई पाटील यांचे गाव आहे चोपडा तालुक्यात बऱ्याच बी आर एस कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवून आपले स्थानिक महत्व जागृत केल्याने कार्यकर्त्यांच्या अशा या पल्लवीत झाले त्याच धर्तीवर रावेर लोकसभामतदार संघाची जागा निवडून येईल असा आत्मविश्वास समाधान बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे.