रावेर वनविभागाची कार्यवाही विनापरवाना सागवान लाकूड वाहतूक करणारी बेलेरो पिकप ताब्यात
रावेर (प्रतिनिधी) कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील तांदलवाडी रस्त्यावरून २७ जानेवारी च्या रात्री गस्त असलेल्या वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन वाहन क्रमांक MH 04 GF -7263 या नंबर ची माल वाहून नेण्याऱ्या बोलेरो या गाडीचा पाठलाग करून विनापरवाना सागवान लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत जप्त करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालवाहू गाडी मध्ये विनापरवाना सागवान लाकूड वाहून नेत होते सदर गाडीत इमारत तील लाकूड व वाहनांची एकूण अंदाजित किमंत ३,८८,११६ रु एवढी असून अवैधरित्या वाहतूक करतांना रंगेहाथ पकडण्यात आल्यानं भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम -41/2 ब 42,52या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कार्यवाहीत विभागीय वनाधिकारी आर.आर.सदगिर साहेब दक्षता धुळे ,उपवन संरक्षक जमीर शेख यावल वन विभाग , तसेच प्रथमेश हडपे सहायक वनसंरक्षक चोपडा व समाधान पाटील सहायक वन संरक्षक यावल वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे , वनरक्षक जगदीश जगदाळे,या पथकाने विनापरवाना सागवान लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यश मिळवले.