राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट एक व्हा ! उर्वेश साळुंखे यांनी लिहिले शरद पवार आणि अजित पवारांना पत्र !
जळगाव जिल्हा- प्रतिनिधी/ विनायक पाटील
चोपडा : बुधगाव येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन गट पडले आहे. या अनुषंगाने साळुंखे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब व मा. अजितदादा पवार यांना पत्र पाठवले आहे.
पत्रात असा उल्लेख केला आहे की, आदरणीय साहेब व दादा आपण काही करा पण एक व्हा….कारण माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला पवार परिवारा सोबत राहायला व पक्षाचं काम करायला खूप मनापासून आवडतं.
असे दोन गट पडल्याने पक्षाच काम करायला मोठ्या प्रमाणात उत्साह वाटतं नाही. असे दोन गट पडल्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक नंबर चा पक्ष बनण्यास कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते. कारण दोन गट असल्याने कार्यकर्ते व नेते विभागले जात आहे. यामुळे पक्ष वाढवायला अडचण निर्माण होते.
यामुळे साहेब आणि दादा आपणास हात जोडून विनंती करतो की आपण आगामी निवडणूकान मध्ये काही करा पण एक व्हा ! असे भावनिक पत्र साळुंखे यांनी लिहिलेले आहे.