राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तळोदा शहरातील बॅनर चर्चेत
नंदुरबार प्रतिनीधी (राहूल शिवदे)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तळोदा शहरातील बॅनर चर्चेचा विषय बनले आहे. बॅनरच्या माध्यमातून थेट भाजपवर या बॅनर वर टीका करण्यात आली आहे. भाजपात घेऊन त्यांच्यावरील इडीची झालेली कारवाई चालूच असल्यास कळवा आणि १ लाखाचे बक्षीस मिळवा. अशा आशयाचे बॅनर तळोदा शहरातली मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या स्मारक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे लावण्यात आले आहे आहे. या बॅनर वर माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष उदेसींग पाडवी यांचे छायाचित्र तसेच शहर अध्यक्ष योगेश मराठे यांचे छायाचित्र आहे. ईडी, सीबीआय आयकरची लोकशाही सलेल्या देशात एक सुद्धा कारवाई झाल्याची तसेच इतर पक्षातील नेत्यांवर ईडी कारवाई केल्यानंतर त्यांना भाजपात घेऊन त्यांच्यावरील ई डी ची झालेली कारवाई चालूच असल्यास कळवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवा अशा आशय या बॅनर वर लिहून थेट भाजपला आव्हान केले आहे. हे बॅनर तळोदा शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.