ताज्या बातम्या

राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श पतसंस्थेस महसूल मंत्री ना.विखे यांच्या हस्ते सहकार समृद्धी पुरस्कार…

प्रतिनिधी – आशिष संसारे

राहुरी – राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेस सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा सहकार समृद्धी पुरस्कार नुकताच शिर्डी येथे महसूल मंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी बुलढाणा अर्बनचे चेअरमन राधेश्यामजी चांडक, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे स्थैर्य निधी महासंघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांचे उपस्थितीत शिर्डी येथे संपन्न झालेल्या पतसंस्था सहकार परिषद या जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी महासंघाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी साई आदर्श पतसंस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार साई आदर्श पतसंस्थेची निवड करण्यात आली याप्रसंगी मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले सर्वांचे हित जोपासणाऱ्या संस्था आपला एक वेगळा ठसा निर्माण करत आहेत इतरांना आदर्शवत व्हावे असे काम करून दाखवल्यानेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ. संगीता कपाळे म्हणाल्या हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे संस्थेच्या प्रगतीसाठी आम्ही आविरतपणे झटत आहोत ठेवीदारांचा विश्वास जिंकत आम्ही यशस्वी ठरलो याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामध्ये संस्थेचे मार्गदर्शक शिवाजीराव कपाळे सर्व संचालक मंडळ कर्मचारी व कलेक्शन एजंट यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सभासद ठेवीदार खातेदार यांनी मोठा विश्वास साई आदर्शवर टाकला आहे त्यास तडा जाणार नाही.यापुढेही संस्था झपाट्याने प्रगती करेल असा विश्वास शिवाजीराव कपाळे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कडूभाऊ काळे,वसंत लोढा, स्थैर्य निधीचे संचालक मंडळ व पारस नहार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *