वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा जागा ए.आय.एम.आय.एम लढणार : आसिफ खान
ए.आय.एम.आय.एम.ची विधानसभा बैठक संपन्न
प्रतिनिधी अर्पित वाहाणे वर्धा
वर्धा महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा ए.आय.एम.आय.एम.ची स्थानिक बोरगाव येथील रॉयल पॅलेस येथे जिल्हा अध्यक्ष सलीम उर्फ सल्लू भाई यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष आसिफ खान यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित असताना ए.आय.एम.आय.एम. चे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी वर्धा जिल्ह्यातील चार ही विधानसभा पक्ष लढवणार असुन या संदर्भात अर्ज तपासणी व चाचापणी प्रक्रिया प्रदेश समिती कडून सुरू असल्याची माहिती दिली.ए.आय.एम.आय.एम.ची चार ही विधानसभेची उमेदवारी ही लवकरच जाहीर करण्यात येणार असुन सर्व उमेदवार हे विद्यमान राजकीय नेत्यांना घाम सोडणारी जोरदार लढत देण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली.