ताज्या बातम्या
वाघोड उपसरपंच पदी जगदीश महाजन यांची निवड

प्रतिनिधी / कमलेश पाटील

रावेर तालुक्यातील वाघोड येथे ग्राम पंचायत च्या उपसरपंच पदी जगदीश महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पॅनल प्रमुख गुणवंत सातव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एकूण अकरा सदस्य पैकी ग्राम पंचायत च्या राखीव सरपंच पदी संजीव मशाने हे कार्यरत असून पॅनलने ठरल्याप्रमाणे पाच सदस्यांना उपसरपंच पद प्रत्येकी एक एक वर्ष यानुसार आता जगदीश महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी पॅनल प्रमुख गुणवंत सातव सरपंच संजीव मशाने, ग्राम विकास अधिकारी अनिल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.