वाघोड येथे हरिनाम सप्ताह ची सांगता
रावेर (प्रतिनिधी) – कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील वाघोड येथे धर्मनाथ बिज निमित्ताने आयोजित हरिनाम सप्ताह ची सांगता श्री कन्हैयालाल महाराज ब्रम्हपूर
यांच्या श्रीमुखातून भागवत कथा वाचन कल्याचे किर्तनांने झाली नंतर पुर्ण गावातील मंडळी नी महाप्रसादाचा लाभ घेतला नंतर गावात दिंडी सोहळा मार्गात सुंदर अशा रांगोळ्या नी दिव्यांनी दिंडी सोहळा च्या कार्यक्रमाचे स्वागत गावकऱ्यांनी केले लहान मुलीनी व महिलांनी डोक्यात कलस घेऊन टाळ मृदुंग च्या तालावर रामकृष्ण हरी नामाचा गजरात पावली टाकत विठुरायाच्या चा गजर केला व भंजणी मंडळी पण पावली खेळत आनंद घेतला.
श्री भागवत कथेचे ग्रंथ डोक्यावर घेऊन सर्व गावभर मिरवणूक काढण्यात आली व नंतर महात्मा फुले चौक मध्ये भारूडाचा कार्यक्रम होऊन कथेची सांगता करण्यात आली यावेळी समस्त भजनीं मंडळ व ग्रामस्थ उपस्थित राहून अर्थक परिश्रम घेतले.