विजयाचा क्रमांक एक ! बॅलेटवर गुलबराव देवकरांना मिळाला पहिला क्रमांक !
प्रतिनिधि – विनोद रोकडे / अजय बाविस्कर
जळगांव ग्रामीण – विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा पेव चढला आहे. मात्र जळगांव ग्रामीण मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत आहे. जळगांव ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत आहे. मंत्री आणि माजी मंत्री या दोघांमध्ये लढत होत असल्याने मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी माघारीचा दिवस असल्याने मतदारांचे होणाऱ्या प्रत्येक घडामोडींकडे लक्ष लागून आहे. माघारीच्या दिवशी एकूण उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी माघार घेतली तर ११ उमेदवार रिंगणात आहेत. या ११ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील ३ उमेदवार आहेत. ज्यात शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि मनसे असे ३ उमेदवार तर इतर नोंदणीकृत पक्षांचे ज्यात हिंदुस्तान जनता पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांचे २ उमेदवार तर अपक्ष ६ असे एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सरळ सरळ लढत मानली जात आहे.
गुलाबराव देवकरांचा क्रमांक १
उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटपाचा कार्यक्रम निवडणुक आयोगाच्या वतीने घेण्यात आला. ज्यात उमेदवारांचे बॅलेट मशीन वरील क्रमांक देखील ठरविण्यात आलेत. ज्यात तुतारी वाजविणाऱ्या माणसाचे चिन्ह असलेल्या गुलाबराव देवकर यांना पहिला क्रमांक मिळाला असून धनुष्यबाण चिन्ह असलेल्या गुलाबराव पाटील यांना दूसरा क्रमांक मिळाला आहे. गुलाबराव देवकर यांना पहिला क्रमांक मिळाल्याने ‘देवकरांचा पहिला क्रमांक, म्हणजेच विजयाचा क्रमांक’ अश्या चर्चा मतदार संघात रंगू लागल्या आहेत.