अंबड : ग्रामीण भागातील शाश्वत पाणीपुरवठा योजनांसाठी जल जीवन मिशन प्रकल्पात लोक सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून गावकऱ्यांनी लोक वर्गणी भरून प्रकल्प यशस्वी करावा असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था भारत सरकारचे प्रवीण प्रशिक्षक मिलिंद सावंत यांनी केले. केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने व ग्राम विकास संस्था छत्रपती संभाजी नगरच्या सहकार्याने अंबड तालुक्यातील जल जीवन मिशन प्रकल्पातील ग्रामस्तरीय भागधारकांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी मोरे हे होते. तर मंचावर यशदाचे प्रवीण प्रशिक्षक मच्छिंद्र पंडित ग्राम विकास संस्थेचे प्रकल्प समन्वय राहुल रगडे, सरपंच मंगला कानडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्रशिक्षक तथा धरती धन आयएसएची प्रकल्प संबंध श्री सावंत यांनी अंबड तालुक्यातील 40 गावांमध्ये जल जीवन मिशन प्रकल्पाची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यात येत अस ून ग्रामस्थांच्या लोकसहभागातून योजना पूर्ण केल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी जल जीवन मिशन योजनेची ओळख या विषयावर श्री पंडित यांनी तर ग्रामस्तरीय भागधारकांच्या जल जीवन मिशन मधील भूमिका आणि जबाबदाऱ्या याबाबत विनोद बागुल यांनी तर जल जीवन मिशन योजनेत जनतेचा सहभाग या विषयावर प्रवीण प्रशिक्षक मिलिंद सावंत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बागुल यांनी तर आभार प्रदर्शन रवी सातदिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास संस्थेच्या टीमने विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर पाणीपुरवठा कर्मचारी यांची उपस्थिती होती.