शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा येथे फार्मसिस्ट डे उत्साहात साजरा !

पाचोरा – गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक फार्मसिस्ट डे उत्साहात साजरा करण्यात आला. “THINK HEALTH,THINK PHARMACIST ” या वर्षीच्या थीमनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज दिलीप पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. विद्यार्थ्यांनी फार्मसी व्यवसायाचे महत्त्व, औषधांचे योग्य वितरण, रुग्ण सुरक्षा आणि आरोग्य जागरूकता यावर आधारित सादरीकरणे केली. प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये चुरस बघायला मिळाली,त्यानंतर पाचोरा शहरात जाऊन फार्मासिस्ट बांधवांचे व हॉस्पिटल फार्मासिस्ट यांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “फार्मासिस्ट समाजातील एक महत्त्वाचा दुवा आहे, जो रुग्ण आणि औषध यांच्यामध्ये सेतूचे काम करतो. योग्य औषधोपचारासाठी फार्मासिस्टचे ज्ञान आणि योगदान अमूल्य आहे.”
या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण फार्मसी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब पंडितराव शिंदे,सेक्रेटरी जे.डी काटकर, जॉईंट सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे व उपाध्यक्ष श्री. नीरज मुनोत यांनी कौतुक केले.