जळगांव जिल्हा

शेतकरी नेते ईश्वर पाटील (लालासर) यांच्यासह इतरांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश

जळगांव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे किसान सेल तालुका अध्यक्ष तसेच ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते श्री.ईश्वर पाटील (लालासर) यांच्यासह इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. नुकतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगांव जिल्हा दौऱ्यावर होते.

या दरम्यान उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शेतकरी नेते ईश्वर पाटील (लालासर) यांच्यासह विद्यमान शेती संघ संचालक दिलीपनाना पाटील, माजी पंचायत समिती सभापती सुनील मोरे, अल्पसंख्यांक सेल शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष  राहत अली नूर अली, युवक उपाध्यक्ष एडवोकेट सागर गुजर, आव्हाने गावाचे उपसरपंच मंजूर दादा, माजी सरपंचांचे भाऊ रमण दादा, वाणी समाजाचे अध्यक्ष राजेंद्रदादा वाणी अशा अनेक कार्यकर्त्यांनी श्री.ईश्वरभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटात अजितदादांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी या प्रवेशाने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटास मोठी ताकद मिळणार असल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *