शेतकऱ्यांनो सावधान ; चोपड्यात कापसाचे नकली बियाणे

चोपड्यात कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत सुमारे अठरा लाख बनावट htbt कापूस बियाणे जप्त संशयित आरोपीवर गुन्हा दाखल.
चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे आज जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के ,पोलिस निरीक्षक मधुकर साळवे ,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले. जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे,जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार,किरण पाटील कृषी अधिकारी,पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील,विद्या इंगळे,प्रकाश मथुरे,समा तडवी या पथकाने चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे अक्कुल खेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे १२७३ पाकिटे १७ लाख ८२ हजार २०० किमतीचा बियाणे साठा जप्त केला असून बियाणे कायदा,बियाणे नियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियम,महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम,पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे. P