श्री मरी माता मंदिर संस्थान, धरणगाव येथे भव्य महाप्रसाद आयोजनाबाबत बैठक संपन्न

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगांव येथील श्री मरी माता मंदिर संस्थान येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता २७ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य महाप्रसाद आयोजनाच्या नियोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
प्रारंभी संस्थेचे पदाधिकारी रमेश चौधरी यांनी प्रास्ताविकातुन बैठकीची रुपरेषा सादर केली व संस्थेचे विश्वस्त जेष्ठ पत्रकार कडू रुपा महाजन,आपल्या मनोगतातुन ग्रामदैवत मरीआई मंदीर हे संपूर्ण गांवाची आहे व सर्व समाजाचे श्रध्देचे व भावनेचे व विश्वासाचे प्रतिक आहे आपण फक्त विश्वस्त आहोत म्हणुन कार्यक्रम यशस्वी साठी मरीआई संस्थान,व जागृती युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच शहरातील सर्व समाज बांधवांनी एकत्रीत सहभागी होऊन कार्येक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन केले प्रमुख अतिथी सांवता माळी समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष व्हि टी माळी व विनायक महाजन यांनी 27 जानेवारी रोजी होत असलेल्या महाप्रसादाचा कार्यक्रमा साठी सर्वपरी सहकार्य करु अशी भावना व्यक्त केली व नियोजना संबधी मार्गदर्शन केले.
येत्या दिनांक 27 जानेवारी 2026 (मंगळवार) रोजी होणाऱ्या महाप्रसाद कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंदिराच्या जीर्णोद्धारासह महाप्रसाद आयोजनाबाबत आवश्यक मार्गदर्शन व तयारी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत महाप्रसादाचे आयोजन सुव्यवस्थित व भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये महाप्रसादाची तयारी, स्वयंपाक व्यवस्था, आवश्यक साहित्य खरेदी, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता व्यवस्था, शिस्तबद्ध रांगा, स्वयंसेवकांची नेमणूक तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना यांचा समावेश होता.
दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यासाठी मंदिर परिसरात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
तसेच, या पवित्र कार्यासाठी ज्या भाविकांना आपल्या परीने कोणत्याही स्वरूपात (आर्थिक, साहित्य, सेवा किंवा श्रमदान) मदत करायची असेल, त्यांनी थेट आयोजक किंवा मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
भाविकांच्या सहकार्यामुळे हे आयोजन अधिक भव्य व यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, भाविक तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने सहकार्य करण्याचे आश्वासन देत आयोजन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला, व सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मरी माता मंदिर संस्थान,व जागृती युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचा पटांगणावर झालेल्या ह्या बैठकीत असंख्य नागरीक उपस्थित होते.


