धरणगाव शहर
श्री संत भीमा भोई जयंती भोई वाडा येथे साजरी
धरणगाव – येथील भोई समाज पंच मंडळाच्या वतीने भोई वाडा येथे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन भोई समाज पंच मंडळाचे अध्यक्ष सुनील जावरे, उपाध्यक्ष जीवन भोई, फत्तरु जावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाना लांबोळे यांनी केले. याप्रसंगी मान्यवर दीपक जावरे, शरद जावरे, राजू भोई, महेंद्र भोई, आखाडू भोई, राजू भोई, आनंदा भोई, बबलू भोई, रावा भोई, पंकज भोई, संतोष लांबोळे, नाना भोई, अजय भोई, आण्णा भोई, रवी भोई, बापू भोई, छोटु जावरे, दशरथ जावरे, गुलाब जावरे, अनिल जावरे, रोहिदास ढोले यांचेसह भोई समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते.