संत मुक्ताबाई महाविद्यालयात आज डॉ.देवीसिंहजी शेखावत साहेब यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
मुक्ताईनगर – संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मध्ये आज दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी भारतातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ तसेच विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. देवीसिंहजी शेखावत यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, वक्तृत्व स्पर्धा, रुग्णांना फळ वाटप इत्यादी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. निसर्ग, स्त्री सक्षमीकरण, अध्यात्म, व्यसन मुक्ती इत्यादी विषयांवर आधारित सुंदर अशा रांगोळ्या विद्यार्थीनींनी रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने काढल्या. या स्पर्धेत प्रियंका सोनवणे, जागृती पाटील, आरती भलभले या विद्यार्थिनींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले.उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, आजचा तरुण, आजची स्त्री, लॉक डाउन मधील शिक्षण, शिक्षण व्यवस्था इत्यादी विषयांवर भाषण करून आपली अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. वक्तृत्व स्पर्धेत हेमंत पाटील, दिव्या वाघ, गायत्री चीम या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले.पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, विविध शास्त्रे तसेच सायबर सिक्युरिटी इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण असे पोस्टर विद्यार्थ्यांनी तयार केले आणि त्यांचे सादरीकरण केले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रतिक्षा भंसाली, जागृती बारी, अनुष्का पुनासे, अंकिता निळे या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.ग्रामीण रुग्णालयातील गरजू रुग्णांना साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. आय डी पाटील यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आली. आदरणीय साहेबांचा वाढदिवस महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. आय डी पाटील यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. आदरणीय साहेबांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान तसेच मुक्ताईनगर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सुरू केलेल्या शैक्षणिक संकुलातील योगदानाबाबत अनुभव व्यक्त केले. यावेळी साहेबांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सांगून साहेबांच्या जीवनावर आधारित चरित्र पर ग्रंथ इंद्रपुरीचा राणा हा ग्रंथ सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वाचावा आणि त्यातून संघर्षातून स्वतःचे आयुष्य घडविण्याची प्रेरणा घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय डी पाटील यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक माननीय प्राध्यापक एल बी. गायकवाड, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक प्राध्यापक बी आर मिस्तरी, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नितीन काटे, संत मुक्ताबाई इंग्लिश मिडीयम च्या संचालक श्रीमती वैशाली सिसोदिया, महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री आर सी पाटील हे उपस्थित होते तसेच सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.