संपुर्ण भारतातील धोबी समाज एकत्र झाल्यास अनुसूचित जात चे आरक्षण लागू होणारच
दिल्ली/पुणे : भारतातील धोबी समाज एकत्र आल्यास अनुसूचीत जातीचे आरक्षण लागू करून संपुर्ण धोबी सामाजाला एका कॅटेगरीत आणणे नक्कीच शक्य आहे.त्यासाठी भारतातील धोबी समाजाने एक होऊन राजकीय शक्ति ला जागं केल्यास रजक समाजाला नक्की न्याय मिळणार असे प्रतिपादन दिल्लीत झालेल्या 8, 9 एप्रिल रोजीच्या विश्व रजक महासंघाच्या राष्ट्रिय अधिवेशनाचे प्रमुख अतिथी लखनऊ येथील आयईएस अधिकारी श्री. जय सिंह रजक यांनी केले.
नवी दिल्लीतील डॉ.आंबेडकर भवनात 8, 9 एप्रिल रोजी विश्व रजकचे पहीले राष्ट्रिय अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनासाठी भारतातून १६ – १७ राज्यातून प्रतिनिधी आले होते. पुण्यातील नेशनल लॉ कमिटी प्रेसिडेंट ऍड, संतोष शिंदे, प्रदेश कमिटी प्रेसिडेंट सौ. संगिता ननावरे, तसेच मुंबईतील प्रदेश महिला अध्यक्ष- उषा कनोजिया, नेशनल सेकेट्री मुन्नालाल कनोजिया, वरिष्ठ जन.सेकेट्री सीडी राम कनोजिया, श्री, प्रागिलाल सहित पूनम बेनिवाल, पुष्पा दास, अनुराधा सोलंकी, कांता चौहान, कांता माथूर, प्रविणा मॅडम आदी महिला पदाधिकारी देखील भारताच्या अन्य राज्यातून उपस्थित होत्या. अधिवेशनाची सम्पूर्ण तयारी व धावपळ संघाचे संस्थापक श्री. रंजीत कुमार बैठा यांनी केली.यावेळी राष्ट्रिय अध्यक्ष माजी आयईएस अधिकारी श्री. चिंतामणी जी यांनी भारतातुन आलेल्या रजक समाजाच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून अनुसूचित जात आरक्षण सम्पूर्ण भारतातील रजक समाजाला लागू होण्यासाठी एकजूट दाखवून राजकीय शक्तिच्या मदतीने लवकरात लवकर मिळण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
दिल्ली युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ.चंद्र कांता माथूर यांनी देखील रजक समाजाला वेळीच जागे करून तसेच एकजूट होउन संविधानात सांगितल्या मार्गावर चालून राजनैतिक इच्छा शक्ती ला जागे करून डॉ. बाबासाहेब यांनी दाखविलेल्या संविधानिक मार्गावरून चालण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कायद्याची लढाई लढताना संविधानात सांगितल्या मार्गावर चालून भारतातील सम्पूर्ण रजक समाज तसेच रजक संघटना यांनी एकत्र येवुन अनुसुचित जात आरक्षण तुरंत लागू करण्यासाठी लढाई साठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील ॲड. संतोष शिंदे, पुणे यांनी यावेळी केले. त्यासाठी अधिक माहितीसाठी मोबा नं-7507004606 वर संपर्क करण्याचे नेशमल लॉ कमिटी प्रेसिडेंट ऍड. संतोष शिंदे यांनी आवाहन केले आहे.