सकाळी झाडूने तर रात्री कीर्तनाने लोकांचे मन स्वच्छ करणारे संत म्हणजे गाडगेबाबा -विनोद रोकडे
धरणगाव – येथील महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परीट धोबी समाजाचे युवक शहर अध्यक्ष विनोद रोकडे यांनी आपल्या विचार मांडले महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती . अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक व्ही टि माळी यांनी प्रास्ताविक केले त्यानी संत गाडगेबाबानी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाल हे भजन गाऊन लोकांना स्वच्छता संदेश दिला ते हातात गाडगे घेऊन फिरत असल्याने त्यांना गाडगेबाबा ही उपाधी दिली गाडगे बाबा ना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ही गुरुस्थानी मानत असे व्ही टी माळी सर यांनी आपल्या प्रास्ताविक केले यावेळी उपस्थित महात्मा फुले हायस्कूल चे मुख्यध्यापक जे एस पवार सर, पर्यवेक्षक एम बी मोरे सर कोळी सर, आढवे सर ,पी डी पाटील सर, हेमंत माळी सर , महाजन मॅडम, वराडे मॅडम व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते*धरणगाव नगरपालिका येथे गाडगेबाबा जयंती साजरी* धरणगाव नगरपालिका मध्ये संत गाडगेबाबा याची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नगरपालिका चे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, कर निरीक्षक प्रणव पाटील, परीट समाजाचे विनोद रोकडे यांचा हस्ते माल्यार्पण करण्यात आले यावेळी उपस्थित लिपिक अनिल पाटील, संजय शुक्ला , जितू नाना वाघमारे, भगवान माळी , रितेश जोशी , सिकंदर पवार दीपक वाघमारे नारायण माळी , आरिफ शेख , महेश चौधरी, युवराज चौधरी , गणेश पाटील, गणेश गुरव प्रशांत चौधरी सह सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.