सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात ; 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील
चोपडा (प्रतिनिधी) :- पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचा चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिन पोलीसांनी लासूर ते सत्रासेन रस्तावर त्यांची मोटार सायकल अडवून थांबवले होते. तुमच्या जवळ गांजा आहे असे सांगुन तुम्ही पोलीस स्टेशनला चला असे त्यांना सांगण्यात आले होते. सांगितले. तुमच्याजवळ गांजा असून तुमच्याविरुद्ध गांजाची केस करायची आहे. जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले होते.तक्रारदार यांचे नातेवाईका कडुन रात्री 30000/ हजार रुपये घेतले . व मोटार सायकल त्यांनी ठेवून घेतली जर तुम्हाला मोटार सायकल सोडवायची असेल तर तुम्हाला उर्वरीत 20000 हजार रुपये आम्हाला दयावे लागतीत असे सांगितले . त्यानंतर दि 24/8/2023 रोजी तक्रारदार यांचे कडेस आलोसे यांनी गांजा ची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडण्यासाठी 20000 हजार रुपयेची मागणी केली व तळजोडअंती 15000 हजार रुपये पंचासमक्ष आलोसे यांनी लाचेची मागणी करून आलोसे यांनी उर्वरीत 15000 हजार रुपये दि 25/8/2023 रोजी चोपडा गावी स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनी सापळा रचला पोलीस अधिक्षक नाशिक श्रीमती शर्मिला घारगे- वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखालीअमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक,स.फौ. दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने यांनी केली कारवाई मदत पथक-एन.एन.जाधव पोलीस निरीक्षक स.फौ. सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ.सचिन चाटे आदिंनी काम पाहिले.