सुशिल महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्ररोग व दंतरोग तपासणी…

अमळनेर – येथील कुंटे रोड वरील आस्था क्लिनिक मध्ये महंत प्रा हभप डॉ सुशिलजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अजिंक्यक्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, दंतचिकित्सा शिबीर व वृक्षारोपण असे नानाविध कार्यक्रम संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सद्गुरू श्री तानाजी महाराज यांच्या परंपरेतील वंशज महंत प्रा हभप डॉ सुशिलजी महाराज विटनेरकर (Mpharmacy PHD) यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्यक्रांती फाउंडेशन तर्फे विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सद्गुरू तानाजी महाराज यांच्या मठात मान्यवरांच्या उपस्थितीत वडाच्या वृक्षाची लागवड करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उदघाटन झाल्यानंतर नेत्ररोग तपासणी – नेत्ररोग शस्त्रक्रिया व तसेच दंतरोगचिकित्सा शिबीर कुंटे रोड येथील आस्था क्लिनिक मध्ये संपन्न झाले, या शिबिरात अनेक नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रम प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी हभप सुशिल महाराजांवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या उपक्रमशिलतेचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिलदादा पाटील यांच्या मातोश्री पुष्पलता भाईदास पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय्य सहायक नवलसिंगराजे, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित भांडारकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, अध्यक्ष निमा अमळनेर डॉ विशाल बडगुजर, रा.स्व.संघ अमळनेर विभाग प्रमुख चंद्रकांत दादा, कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर ट्रस्ट विटनेरचे अध्यक्ष दीपक पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहित पवार, सद्गुरु संत तानाजी महाराज मठाचे हभप भानुदास महाराज, नवलनगरचे स्वामी शिवानंदजी महाराज, चोपड्याचे हभप बाळासाहेब बोरसे, मंगळग्रह मंदिराचे उपाध्यक्ष एस एन पाटील, आस्था क्लिनिकचे डॉ चंद्रकांत पाटील, डॉ महेश पाटील, डॉ निलेश शिंगाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अजिंक्य जाधव, उपाध्यक्ष गौरव पाटील, कार्याध्यक्ष विवेक जाधव, प्रदेशाध्यक्ष समाधान काळुंखे, जळगांव सोशल मीडिया जिल्हाप्रमुख तुषार धनगर, नितीन धनगर तसेच अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे कार्यकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील व जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


