सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचा केला सत्कार

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांची रजा रोखीकरणाची रक्कम थकबाकी होती सन 2011 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाची रक्कम अद्याप पावतो मिळालेले नव्हती त्यातील काही कर्मचाऱ्यांनी सदर रकमा काढून घेतल्या होत्या सन २०११ पासून ज्या कर्मचाऱ्यांच्या रजा रोखी करण्याच्या रकमा थकीत होत्या अशा कर्मचाऱ्यांनी श्री प्रवीण देशपांडे श्री दीपक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण केले होते. माननीय श्री रामनिवास झंवर यांनी नगरपरिषद धरणगाव येथील मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री दीपक चौधरी व श्री प्रवीण देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी यांनी मुख्याधिकारी श्री झंवर साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या व्यथा ,रकमा न मिळाल्याने होणारे आर्थिक नुकसान ,कुटुंबाची होत असलेली ओढताण याबाबत सर्व कल्पना दिली मुख्याधिकारी श्री झंवर साहेब यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रजारोखीकरणाची रक्कम मार्च 25 अखेर देण्याचे आश्वासन दिले त्यानुसार सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांना माहे मार्च 2025 अखेर रजा रोखी करण्याच्या शिल्लक रकमेपैकी 50 टक्के रक्कम 30 मार्च रोजी खात्यावर वर्ग करण्यात आली तसेच उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकरअदा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले होते मुख्याधिकारी झंवर साहेब यांनी पैशांची उपलब्धता करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहिलेली 50% रजा रोखी करण्याच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम दिनांक10 सप्टेंबर 2025 रोजी बँकेद्वारे अदा केली त्यामुळे सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेणारे अधिकारी आल्यावर त्याच्या कसा सकारात्मक परिणाम जाणवतो याचा अनुभव सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आला.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी म मुख्याधिकारी रामनिवास झंवर साहेब हे ज्याप्रमाणे आपल्याशी बोलले त्याप्रमाणे ते वागले यासाठी त्यांच्या चांगुलपणाच्या वर्तनासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन आज रोजी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन छोटे खाणी सत्कार केला तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रजा रोखी करण्याची रक्कम अदा करण्यासाठी कार्यालय अधीक्षक श्री पारधी साहेब लेखाधिकारी श्री श्रीपाद मोरे लेखापाल श्री शिवाजी चव्हाण आस्थापना प्रमुख श्री.मंगेश लंके श्री सिकंदर पारधी रोखपाल श्री मुजलीम शेख या सर्वांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन छोटे खाणी सत्कार करण्यात आला आहे.
माननीय श्री राम निवास झंवर साहेब मुख्याधिकारी यांनी सत्कार झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची राहिलेली उर्वरित रक्कम देखील त्वरित देण्याचा माझा मानस मानस असून तसा प्रयत्न मी करत आहे तरी आपणास लवकरच ती आनंदाची बातमी देखील देण्यास मी उत्सुक आहे . आपल्या रजारोखीकरणाची रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह पाहून मला खूप समाधान मिळाले आहे व काम करण्यास प्रोत्साहन मिळालेले आहे असे वक्तव्य केले
माननीय मुख्याधिकारी श्री रामनिवास झंवर साहेब यांच्या सत्कार समारंभाला श्री प्रवीण देशपांडे श्री दिपक चौधरी श्री रामराव भदाणे श्री दिलीप बडगुजर श्री सुरेश बडगुजर श्री भगवान बडगुजर श्री योगराज मराठे श्री जयेश भावसार यासह इतर सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते