हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र या अभियान अंतर्गत धरणगांव तालुक्यातील शेकडो ठिकाणी वृक्षारोपण

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
जिल्हा समादेशक होमगार्डस् तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते साहेब यांचे आदेशानुसार तसेच होमगार्ड चे प्रशासकीय अधिकारी श्री आर.एम.काळे केंद्र प्रमुख गंगाधर महाजन वरिष्ठ निदेशक मदन रावते यांचे मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक अधिकारी ईश्वर महाजन यांचे नेतृत्वाखालील धरणगांव होमगार्ड पथकातील दि १४/०९/२०२५ वार रविवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या वृक्षारोपन मोहिम हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र या महत्वाकांक्षी अभियान अंतर्गत गृह विभागाच्या ०५लक्ष वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांसाठी धरणगांव शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील ठिक ठिकाणी सार्वजनिक जागेत होमगार्ड पथक धरणगांव कडून आंबा चिंच सिसम निंब बांबू असे शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी लिपिक जानकीराम पाटील होमगार्डअनिल सातपुते आत्माराम चौधरी रविंद्र बडगुजर सुरेश माळी हर्षल सावंत गणेश सावंत संदिप पाटील यांच्या सह अनेक होमगार्ड उपस्थित होते तालुक्यातील नागरिकांकडून सदर अभियानाचे कौतुक व्यक्त करण्यात आले.


