हातेड येथे चोपडा बीटस्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धा संपन्न
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
दिनांक ५ऑक्टोबर २०२४ व ६ऑक्टोबर २०२४ रोजी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा हातेड बु.येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आयोजित चोपडा बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुणजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.सदर क्रीडा स्पर्धेत एकूण १३ शाळांच्या एकूण ९००विद्यार्थी व ९० क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
क्रीडास्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुउद्देशीय जनविकास विकास मंडळ,हातेड बु.या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक सोनवणे,उद्घाटक पवनजी पाटील(सहा.प्रकल्प अधिकारी,यावल),प्रमुख पाहुणे संदीप पाटील (सहा. प्रकल्प अधिकारी,यावल),संस्थेचे संचालक सागर सोनवणे,एम. आर.सुलताने(कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा बीट प्रमुख)जितेंद्र पाटील (प्राथ.मुख्याध्यापक) व संदीप पाटील(माध्य.मुख्याध्यापक) तसेच चोपडा बीटचे सर्व मुख्याध्यापक उपस्थितीत होते.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पवन पाटील साहेब (सहा.प्रकल्प अधिकारी) यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.
चोपडा बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नियोजन व मार्गदर्शन क.शि.विस्तार अधिकारी तथा चोपडा बीट समितीच्या अध्यक्ष एम.आर. सुलताने यांनी केले होते.
बीट समिती प्रमुख भूपेंद्र पाटील तसेच बीट समितीचे सदस्य व पंच भालचंद्र पवार,प्रमोद भालेराव,मधुकर भोई, व्ही.टी.राठोड,योगेश पाटील, सतीश पाटील,प्रदीप वाघ, निलेश धनगर,एम,सी.शिंदे, पी.डी महाजन,हितेंद्र पाटील,अनिल पावरा,ज्ञानेश्वर पाटील,मुकेश पाटील,जितेंद्र पाटील,सचिन पाटील,तसेच चोपडा बीट मधील सर्व क्रीडा शिक्षक,कर्मचारी वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
तीन दिवसीय चोपडा बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा ज्यांच्यामुळे खऱ्या गाजल्या त्या सर्व खेळाडूंना प्रकल्प स्तरीय खेळासाठी शुभेच्छा संदेश देण्यात आले.सर्वांचे आभार मानून बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेची सांगता करण्यात आली.