महाराष्ट्र
हिस्सी येथे महाराष्ट्र दिन संपन्न
लोकनायक न्युज प्रतिनिधी – रोहित झोल (सेलू जिल्हा परभणी)
परभणी – जिल्हातील सेलू तालुक्यातील हिस्सी येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावाचे सरपंच दिपक गोरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण गावाचे पोलीस पाटील सुदर्शन मगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मोगल, सहशिक्षक रुपेश कुलकर्णी, राजेश कहां एकर विनायक गाडेकर, सुभाष पंडित, कृष्णा कटारे, शिक्षिका अनुराधा गोरे, सौ सोनवणे व विद्यार्थी उपस्थित होते.