“४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक”

धरणगाव प्रतिनिधी – विनोद रोकडे
धरणगांव : शहरातील लहान माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन होते. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अधिवेशनबाबत विस्तृत माहिती दिली. आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक विचारांवर चालूया. अंधश्रद्धा, कर्मकांडाला दुर सारू या व आपल्या परिसरात सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, दशपिंड विधी, साक्षगंध सोहळा करूया. यानंतर सत्यशोधक दिनदर्शिका संदर्भात विस्तृत माहिती दिली आणि अधिवेशनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी लहान माळीवाडा परिसरातून जास्तीत जास्त कार्यकर्ते येतील आणि सर्वोतपरी सहयोग करू. यांसह जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी अधिवेशनाला येण्याचे आवाहन देखील केले. याप्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेवक विलास महाजन, सचिव दिपक महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, कालिदास महाजन, विजय महाजन, सोनू महाजन, हभप नाना महाराज, राजेंद्र महाजन, सुधाकर महाजन, पिंटू महाजन, दिलीप बापू यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय महाजन यांनी तर आभार गोरख देशमुख यांनी मानले.


