निर्व्यसनी राहून गोसेवा केल्यास भगवंत प्राप्ती होते : गोपालानंद सरस्वती
चोपडा – महान क्रांतिकारी गोभक्त् राष्ट्रीय संत स्वामी गोपालानंद सरस्वती जी उर्फ संत जगदीश गोपाल जी महाराज यांचे 1 मे 2022 रोजी चोपडा श्रीराम नगर येथील संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे दुपारी ठीक बारा वाजता मंगल प्रवेश झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी त्यांचा जयघोष करून पुष्पमाला ने स्वागत केले.
सुरुवातीला महाराज यांच्या हस्ते गायीची पूजा करून संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गोअनुसंधान संस्थान चोपडा अध्यक्ष श्री देवकांत् के. चौधरी ,सदस्य श्री सुर्यकांत के. चौधरी व आदींनी सपत्नीक पाद्यपूजा करून महाराज यांचे स्वागत केले. यावेळी आशीर्वचन देताना महाराज ने सांगितले की मोक्ष प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे. हे अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वांनी चहासह सर्व व्यसनांचा त्याग करावा व गायीची मनापासून सेवा करावी. व्यसनी राहून सेवा केल्यास कोणतेही फळ प्राप्त होणार नाही. जन्म-मरणाच्या 84 च्या फेर्यापातून मुक्ती हवी असल्यास निर्व्यसनी राहून सेवा करा तेव्हा भगवंत प्राप्ती निश्चित आहे .यासह सर्वांचे कल्याण होवो असे आशीर्वाद दिले.
यावेळी तेली समाज उपाध्यक्ष टी. एम. चौधरी यांनी महाराज यांचे व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला वर्ग व पुरुष वर्ग यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वांनी दर्शन घेऊन गो मातेचा जय जयकार केला. कार्यक्रमाला नंदू चौधरी, संजय चौधरी, नारायण चौधरी, प्रदेश तेली मान्सून चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत चौधरी, योगिता चौधरी, शशिकांत चौधरी, सुनील चौधरी, सतीश पाटील, गौरव पाटील, जगदीश मिस्त्री, महेंद्र चौधरी, सूर्यकांत चौधरी, लखन तेली, निखिल टेलर, निलेश पाटील, संजय पाटील, डी. व्ही. पाटील, प्रकाश चौधरी, बंटी चौधरी, किरण, राजेंद्र चौधरी यांचेसह चोपडा ,चहार्डी, मामलदे, चुंचाळे, नागलवाडी, निमगव्हाण, आदी ठिकाणचे भक्तगण व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.