जळगाव जिल्हा

राज्यस्तरीय शिल्ड 4.0 स्पर्धेत ९०० विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग

जळगाव – शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संगणक विभागातर्फे राज्यस्तरीय शिल्ड 4.0 या टेक्निकल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्यात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन आणि विनाशुल्क आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्याच्या सर्व भागातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला व पारितोषिक पटकावली.

यावेळी स्पर्धेचे ऑनलाइन उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. व्ही. इंगळे यांनी केले. प्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.बी.वेस्ली व संगणक विभागप्रमुख डॉ.पी.पी.चौधरी उपस्थित होते. स्पर्धेच्या मुख्य समन्वयक डॉ.अश्विनी लोखंडे यांनी स्पर्धेचे स्वरूप व प्रस्तावना सादर केली. यावेळी संगणक विभागाच्या आशा चौधरी, विनिता पाटील, सोनाली जाजू, स्वप्नील सूर्यवंशी, परिधी निगम, नयना बोरसे, अमोल चौधरी, नितीन पवार यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमोल चौधरी, शुभांगी पाटील, स्मिता सुरवाडे आदींनी काम पाहिले. स्पर्धेचे प्रायोजक म्हणून इन्फो प्लॅनेट, सीड इन्फोटेक, दीपस्तंभ प्रकाशन, लिबिटी इन्फोटेक यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन कोमल ढाके, श्रेया अग्रवाल, यश चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन विशाल चौधरी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आदित्य बोधनकर, महेश पिंपरकर, कल्पक नेमाडे, विशाल चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेत Talent Hunt – स्वाती तिवारी (मुंबई), निकिता कुरकुरे(जळगाव), C Quiz – वैष्णवी जगदाळे (नेवासा), निखिल राणे (जळगाव), Chess – अनिरुध्द वेताळ (ठाणे), सौरभ धांडे (जळगाव), Poster Presentation – गायत्री बोगावर (यवतमाळ), साक्षी लोहार (जळगाव), GK Quiz – नयन बारी (मुंबई), निखिल राणे (जळगाव), Project Competition – कल्पक नेमाडे आणि संघ (जळगाव), अजिंक्य महाजन आणि संघ (जळगाव), Virtual Treasure Hunt – विवेक महाजन (जळगाव), प्रथमेश पाटील (जळगाव) यांनी पारितोषिके पटकावली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे