समस्त चौधरी समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक पवन देसले यांना निवेदन

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे
आज धरणगाव शहरात समस्त चौधरी समाजातर्फे पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब यांना निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुनील पंढरीनाथ चौधरी यांच्यावर हॉटेल व्हाईट हाऊसचे संचालक अवधेश छत्रभूज वाजपेयी यांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील पंढरीनाथ चौधरी यांना जातीवाचक शिवीगाळ करून पिस्तूल लावून धमकावले असता त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा या मागणी साठी आज समस्त चौधरी समाजतर्फे निदेवन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
याप्रसंगी समाजाचे ज्येष्ठ सदस्य रमेश किसन चौधरी, उपाध्यक्ष भिका कोंडू चौधरी, मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, मा.नगरसेवक भागवत आप्पा चौधरी, धरणीपुरा विभागाचे दिपक चौधरी, सुनील चौधरी, आबा महाले, नाना महाले, गणेश चौधरी, विजय चौधरी, अशोक व्यवहारे, राजेंद्र चौधरी, अशोक सैदाने, डी.के.चौधरी सर, भैय्या चौधरी, सागर ठाकरे, भूषण ठाकरे, गोपाल चौधरी, अरविंद चौधरी, मनिष चौधरी, राज चौधरी तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

